Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

मोगॅम्बो आला रे…! सुबोध भावेच्या प्रभावी भूमिकेने दिली महत्वपूर्ण विषयाला मनोरंजनाची खमंग फोडणी

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
May 12, 2023
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
ShortFilm
0
SHARES
454
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर टीझरच्या माध्यमातून चर्चेत आलेली एक अर्थपूर्ण, प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडणारी सकस शॉर्ट फिल्म नुकतीच कॉटनकिंग यांनी सादर केली आहे. ती म्हणजे ‘मी, मोगॅम्बो आणि कांदेपोहे’. मोगॅम्बोच्या भूमिकेत अभिनेते सुबोध भावे यांनी चाबूक परफॉर्मन्स केला आहे. तर अभिनेत्री मधुरा वेलणकर साटम यांनी त्यांच्या बायकोची भूमिका प्रभावीपणे साकारली आहे. गंगुबाई फेम सलोनी दैनी या शॉर्ट फिल्मद्वारे मराठीत खणखणीत पदार्पण करतेय. तर अभिनेता अनिरुद्ध देवधर याने मोगॅम्बोच्या मुलाचे काम अचूक आणि सूक्ष्म तरल भावना तीव्रपणे मांडत खमंग फोडणीचे काम केले आहे. या चारही अभिनेत्यांनी त्यांच्या भूमिका सजग केल्या आहेत.

कॉटनकिंग अशा अर्थपूर्ण शॉर्ट फिल्म्स प्रेक्षकांपर्यंत कसे आणते हे पाहणे नेहमीच आश्चर्यकारक ठरते. कॉटनकिंगचे संचालक कौशिक मराठे याबाबत म्हणाले कि, ‘आम्ही समूल्य संस्कार आणि श्रीमंत संस्कृतीत वाढलो आहोत. म्हणूनच ज्या पद्धतीने नैतिक व्यवसाय करतो. तो आमच्या प्रेक्षकांशी जाहिरात किंवा शॉर्ट फिल्म माध्यमातून संवाद साधताना झळकला पाहिजे असा आमचा अट्टाहास असतो. हे केवळ व्यवसायाविषयी नाही, तर मूल्यांबद्दल अधिक आहे. हेच आम्हाला आमच्या प्रेक्षकांसोबत शेअर करायचे आहे’. अद्भूत क्रिएटिव्हजने या शॉर्टफिल्मची निर्मिती केली असून याचे वैशिष्ट्य म्हणजे ते व्यावसायिक आणि अर्थपूर्ण गाभा यांचं एकत्रीकरण सहज सादर करतात. या शॉर्ट फिल्मचे लेखन मोनिका धारणकर यांनी केले आहे तर शॉर्टफिल्म प्रसिद्ध जाहिरात चित्रपट निर्माता आणि क्रिएटिव्ह दिग्दर्शक वैभव पंडित यांनी दिग्दर्शित केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Cottonking Mens Apparels (@cottonking_official)

संस्थापक आणि क्रिएटिव्ह डायरेक्टर वैभव पंडित म्हणाले, ‘कंटेंट बनवणे महत्त्वाचे नाही तर दर्जेदार आणि अर्थपूर्ण कंटेंट बनवणे महत्त्वाचे आहे आणि मी, मोगॅम्बो आणि कांदेपोहे’ हे त्याचे एक उत्तम उदाहरण आहे. असे हुशार अभिनेते, एक समर्पित टीम आणि मुख्यत: कॉटनकिंग आणि त्याच्या टीमकडून मोठा पाठिंबा आणि स्वातंत्र्य मिळाल्याने आम्ही भाग्यवान आहोत. एकूणच, मी, मोगॅम्बो आणि कांदेपोहे ही एक पॉवरपॅक मनोरंजन, जीवनाचा एक अविभाज्य विषय असलेली एक अर्थपूर्ण शॉर्ट फिल्म आहे. सोशल मीडियावर आवर्जून पाहावी. ही शॉर्ट फिल्म कॉटनकिंगच्या YouTube चॅनेल, Instagram आणि Facebook पृष्ठांवर उपलब्ध आहे.

Tags: Instagram PostMadhura Welankarshort filmsubodh bhaveViral VideoYoutube Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group