Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘अलकाताई म्हणजे, मराठी चित्रपट सृष्टीतील झाशीची राणी’; प्रसिद्ध अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 24, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Alka Kubal
0
SHARES
664
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। शुक्रवारी २३ सप्टेंबर २०२२ रोजी मराठी सिनेसृष्टीतील कोहिनुर अर्थात अभिनेत्री अलका कुबल यांचा वाढदिवस झाला. अलका कुबल या दिग्गज अभिनेत्री आहेतच शिवाय त्या खऱ्या खुऱ्या आयुष्यात नाती जपण्यात अव्वल आहेत. आजतागायत त्यांनी मराठी सिनेसृष्टीला कितीतरी एकापेक्षा एक सर्रास चित्रपट दिले आहेत. ‘माहेरची साडी’ हा त्यांच्या कारकिर्दीतील चमचमता तारा आहे असे म्हणायला काही हरकत नाही. त्यामुळे अलका कुबल यांचा स्त्री चाहता वर्ग फार म्हणजे फार मोठा आहे. आता अलका कुबल यांचा वाढदिवस झाला म्हणजे सोशल मीडियावर शुभेच्छांचा गडगडून पाऊस पडला नसेल तर विचारा. पण या सगळ्यात चर्चेत आहे ती अभिनेता मिलिंद गवळी यांची पोस्ट. कारण यामध्ये अलका ताईंच्या एका वेगळ्याच बाजूबद्दल ते बोलले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Milind Gawali (@milindgawali)

अभिनेता मिलिंद गवळी हे सध्या ‘आई कुठे काय करते’ या लोकप्रिय मालिकेतील अनिरुद्ध हे नकारात्मक पात्र साकारत आहेत. त्यांच्या या मालिकेला आणि पात्राला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिल आहे आणि अजूनही देत आहेत. विशेष सांगायचे म्हणजे, अलका ताई आणि मिलिंद गवळी यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकमेकांसोबत स्क्रीन शेअर केली आहे. शिवाय वैयक्तिक आयुष्यातही त्यांनी अनेकवेळा एकमेकांच्या पडत्या काळात मदत केली आहे. म्हणूनच मिलिंद अलका ताईंना आपली मोठी बहीण मानतात आणि आपल्या कुटुंबाचा एक भाग म्हणतात. त्यामुळे अलका ताईंचा वाढदिवस या निमित्ताने मिलिंद यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे. जी चांगलीच चर्चेत आली आहे.

View this post on Instagram

A post shared by Milind Gawali (@milindgawali)

मिलिंद गवळी यांनी अलका ताईंसोबतचे काही क्षण यासोबत शेअर केले आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये मिलिंद म्हणतात की, ‘अलकाताई वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.. अलकाताई म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीतील झाशीची राणी. माहेरची साडी, लेक चालली सासरला यात सोशिक आबला नारी ची भूमिका करणारी अलकाताई, प्रत्यक्ष आयुष्यामध्ये त्या दबंग आहे, वाघीण आहे त्या वाघीण, कोणाचेही बापाला न घाबरणारी, चांगल्याशी खूपच चांगलं आणि वाईट अशी एकदम वाईट. आपल्याला मोठी बहीण असली की कसा तिचा आधार वाटतो आपल्याला, मलाही या रूथलेस Ruthless फिल्म इंडस्ट्रीमध्ये अलकाताईचा खूप आधार मिळाला आहे.असंख्य सिनेमांमध्ये आम्ही एकत्र काम केलं, समीर आणि त्यांच्या होम प्रोडक्शन मध्ये घरचा माणूस म्हणून त्यांनी मला सतत घेतलं. या फिल्म इंडस्ट्री मध्ये खूप कमी माणसं आपली फॅमिली होतात,. अलकाताई माझी फॅमिली आहे.’

Tags: Alka KubalBirthday Special PostInstagram PostMilind Gawaliviral postViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group