Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

गोशाळेत गायींच्या सानिध्यात रमले मिलिंद गवळी; म्हणाले, ‘ज्याच्या घरी गाय आहे त्याची मुलं दुष्काळातही…’

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 4, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Milind Gawli
0
SHARES
65
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अनिरुद्ध हि खलनायकाची भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते मिलिंद गवळी सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. विविध पोस्टमुळे ते नेहमीच चर्चेत येतात. सध्या त्यांनी पुण्याचे श्री रविशंकर सहस्त्रबुद्धे यांच्या गोशाळेला भेट दिल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. सोबत त्यांनी अतिशय लक्षवेधी आणि वास्तववादी कॅप्शन शेअर केले आहे.

View this post on Instagram

A post shared by Milind Gawali (@milindgawali)

यामध्ये अभिनेते मिलिंद गवळी यांनी लिहिले आहे कि, ‘“हंबरून वासराले चाटती जवा गाय, तिच्यामंध्ये दिसती मले तवा माझी माय“. काही दिवसांपूर्वी रावेत पुण्याचे श्री रविशंकर सहस्त्रबुद्धे यांच्या गोशाळेत जाण्याचा योग आला, ते भारता मधले प्रख्यात pure breed गीर गाईंच्या जातीचे संशोधक, अभ्यासक आहेतच, आणि त्यांच्या गो शाळेमध्ये शंभरहून अधिक गीर जातीच्या गायी आहेत , अतिशय सुंदर पद्धतीने त्यांच्या कडे त्या गाईंची निगा ठेवली जाते, ते सगळं पाहून मन भारावून गेलं आणि भरूनही आलं, श्रीकृष्णाच्या गोकुळात गेल्यासारखं वाटलं आणि माझ्या नावातच गवळी आहे. त्यामुळे गाईंच्या सानिध्यात राहणं माझा अधिकारच आहे, कदाचीत म्हणूनच गाईंच्या सानिध्यात माझं मन रमतं.

View this post on Instagram

A post shared by Milind Gawali (@milindgawali)

‘… आणि रविशंकर यांसारख्ये व्यक्ती ज्यांना गाईंविषयी एवढं ज्ञान आहे आणि खूप छान पद्धतीने ते गाईंची काळजी घेतात. त्यामुळे त्यांच्याबद्दलचं माझं प्रेम आणि आदर खूप खूप वाढला आहे. त्यांची गोशाळा बघून, त्यांचं ज्ञान जाणवून त्यांच्याबद्दल मला खूप हेवा वाटला. आपण गवळी असून आपल्याला या जन्मात असं काही जमणार नाही याचीही खंत वाटली. त्या आधी एकदा इस्कॉनच्या गोवर्धन आश्रमात जाण्याचा पण योग आला होता, तिथेही गाईंची निगा फार छान पद्धतीने ठेवली जाते आणि माझा कॉलेजचा मित्र जो आता प्रसिद्ध निर्माता आहे शशांक सोळंकी. त्याने त्याच्या वाड्याला असलेल्या फॉर्मवर गाय पाळली आहे. खरंच मला हेवा वाटतो हा सगळ्या गोष्टींचा’.

‘आजच्या काळामध्ये शहरात राहणाऱ्या लाल गाईला घरी आणणं, ही तर अशक्य गोष्ट वाटते. पूर्वीच्या काळी गावात प्रत्येक घरात एक तरी गाय असायचीच. असं म्हटलं जायचं, ज्याच्या घरी गाय आहे त्याच्या घरी मुलं बाळ दुष्काळात पण उपाशी राहणार नाहीत. आपल्या देशामध्ये असं म्हटलं जातं की गायीच्या पोटामध्ये ३३ कोटी देव असतात. गाईची पूजा केली जाते. कितीतरी वेळेला माझ्या आईने मला गाईसाठी काढून ठेवलेला नैवेद्य गाईला भरून ये असं सांगितलं आणि मी मोटरसायकलवरून गाय शोधत अनेक वेळेला फिरलो आहे. माहीमच्या शितळादेवी मंदिरात गायवाल्या मावशी आणि माझी चांगली ओळखही झाली होती. माझ्या आईची गाई वर खूप श्रद्धा होती. रविशंकरांबरोबर चर्चा करत असताना लक्षात आलं की, आपल्या देशात अनेक ठिकाणी अजूनही गायांची फार काळजी घेतली जात नाही’.

Tags: Instagram Postmarathi actorMilind GawaliSocial Media PostViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group