Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘मोकळी हो बाई, मोकळी हो..’; अभिनेता मिलिंद गवळींच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 14, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Milind Gawali
0
SHARES
59
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अनिरुद्ध म्हणजेच अभिनेता मिलिंद गवळी जितके उत्तम अभिनेते तितकेच उत्तम लेखक आहेत असे म्हणालीला हरकत नाही. आपल्या स्वभावाच्या उलट पात्र साकारत असूनही ते या भूमिकेला न्याय देत आहेत. प्रेक्षक भले त्यांच्यावर संतप्त होत असतील पण हीच खरी पोचपावती म्हणायची. याशिवाय सोशल मीडियावर सक्रिय असणारे मिलिंद गवळी अनेकदा विविध पोस्ट शेअर करत भावना व्यक्त करताना दिसतात. याहीवेळी त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी मराठी सिनेसृष्टीचे गुपित उघड केले आहे. आधीचे चित्रपट रडके असायचे. जे पाहताना स्त्रिया ढसाढसा रडायच्या. तर यामागचं कारण सांगणारी हि पोस्ट आहे. त्यासोबत रडणं किती महत्वाचं आहे हेदेखील मिलिंद यांनी नमूद केलंय.

View this post on Instagram

A post shared by Milind Gawali (@milindgawali)

मिलिंद यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे कि, ‘रडावसं वाटलं तर माणसाने रडावं मन मोकळं करावं असंख्य गोष्टी मनाविरुद्ध घडत असतात, मनाला दुखावणाऱ्या गोष्टी आपल्या आजूबाजूला सतत घडत असतात, आपल्या मनाला त्याचा त्रास होत असतो आणि ते सतत चालू असतं आणि खूप आतल्या आत आपण साठवून ठेवत असतो, मग अचानक बांध फुटतो आणि आपण उपसाभक्षी ढसाढसा रडायला लागतो आणि मग रडून झालं की मन शांत होत, आपल्याला बरं वाटतं पूर्वीच्या काळी कुणी गेलं आणि जर त्याचा जवळचा व्यक्ती रडत नसेल तर त्याला जबरदस्ती रडायला लावायचे. कित्येक वेळा माझ्या कानावर ते शब्द पडलेले आहेत, मोकळी हो बाई मोकळी हो रड’.

View this post on Instagram

A post shared by Milind Gawali (@milindgawali)

एकदा प्रोड्युसर कै.अण्णासाहेब देशपांडे यांना मी म्हणालो होतो, का आपण रडके पिक्चर्स करायचे, का ओडियन्सला आपण रडवायचं. त्यांनी मला सांगितलं होतं की, गावा खेड्यातल्या बायका आयुष्यामध्ये खूप सोसतात खूप सहन करतात, सिनेमाच्या माध्यमातून त्या मोकळ्या होतात, त्यांचं मन शांत होतं, आमच्या प्रोड्युसर कै.वासवानीने “सुन लाडकी सासरची” चित्रपटांमध्ये बायकांना हात रुमाल वाटले होते, त्यांना इतकी खात्री होती की सिनेमा बघताना बायका भरभरून रडणार. सिनेमात काम करताना आम्हाला बरेच वेळेला रडायचे प्रसंग येतात, आम्हचं काम करत असताना मन मोकळं होतं, सामान्य माणसाचं काय होत असेल, काहींना तर रडायची अजिबात सवयच नसते, धकाधकीच्या जीवनामध्ये सगळं मनामध्ये साठवून राहत असेल का? टॉक्सिक Toxic होत असेल का? स्ट्रेसफुल होत असेल का? म्हणून लोक आजारी पडत असतील का? महत्त्वाचं म्हणजे जो माणूस रडतो, ज्याच्या डोळ्यातून अश्रू येतात, तो संवेदनशील तर असतोच पण तोच खरं आयुष्य जगतो असं मला वाटतं.

Tags: Famous Marathi ActorInstagram PostMilind Gawaliviral postViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group