हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘आई कुठे काय करते’ हि मालिका काय आणि कोणत्या मर्यादा ओलांडून गेली आहे याबाबत काही वेगळे आणि विशेष बोलायलाच नको. आता तर प्रेक्षकानजी मालिकेचं भरकटणार वळण, पात्रांमधली नकारात्मकता आणि वारंवार आनंदावर विरजण घालणारे प्रसंग बोचू लागले आहेत. ज्यामुळे अनेकदा हि मालिका ट्रोल होते. या मालिकेत देशमुखांच्या घरी चिमुकल्या जानकीचं आगमन झालं आणि आता आनंद येईल असं सगळ्यांना वाटलं. पण अरुंधती आणि आशुतोषच्या लग्नाचा विषय निघाला.. अन सगळं वातावरण तापलं. त्यात अनिरुद्धने केलेला थयथयाट तर हि भूमिका साकारणारा अभिनेता मिलिंद गवळी यांच्याच डोक्यात गेला. त्यामुळे अनिरुद्धवर संताप व्यक्त करणारी एक पोस्ट त्यांनी शेअर केली आहे.
आई कुठे काय करते या मालिकेत अनिरुद्ध हि भूमिका साकारणाऱ्या मिलिंद गवळी यांनी आपल्याच भूमिकेवर संताप व्यक्त केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलंय कि, ‘अनिरुद्ध अरे थांब जरा थांब, किती बोलतोयस.. खरंच अनिरुद्धसारखी माणसं किती बोलतात आणि काय काय बोलतात, किती मनाला लागेल असं बोलतात, कशाचाच भान ठेवत नाही, समोरच्याला काय वाटेल? त्याला किती त्रास होईल? त्याचं मन किती आपण दुखवतो आहोत, याचं कसलंच भान नाही या माणसाला, मग अशा माणसाची चीड नाही येणार का.? बर्याच वेळेला तर मला सुद्धा त्याची चीड येते’.
‘अनिरुद्ध बोलायला लागला की माझं सुद्धा डोकं भंणभंण करायला लागतात, कधी तर तो इतकं विचित्र बोलतो की मला असं वाटतं की माझं डोकं फुटेल कि काय. पण त्याला बोलावंच लागतं, तो बोलला नाही तर, कसं व्हायचं? काळ्या रंगाचा ब्लॅकबोर्ड असला तरच तर त्यावर पांढरी अक्षर उमटून दिसतील ना. हा अनिरुद्ध तो ब्लॅकबोर्ड आहे. बरं नमिता आणि मुग्धाने लिहिलेलं आम्हा सगळ्यांना बोलावच लागतं, न बोलून सांगतात कोणाला! बरं हा अनिरुद्ध पहिल्या एपिसोड पासूनच असाच आहे, पहिल्या एपिसोडमध्ये अरुंधतीला घराच्या बाहेर काढलं होतं त्याने आणि आता सुद्धा तेच करतोय’.
‘सांगायचा मुद्दा काय आहे की, त्यांनी ही बडबड केल्यानंतर जे काय डोक्याचा भुगा होतो, तो कसा निस्तारायचा, तर शांत बसायचं. Meditation करायचं, पूर्वी बरं होतं, एक खूप शांत मांजर आमच्या सेटवर होती, खूपच मायाळू आणि प्रेमळ होती, तिच्याबरोबर मला खूप शांत वाटायचं, छान वाटायचं, ति जवळ येऊनच बसायची, तिच्या बरोबर माझं डोकं शांत व्हायचं पण काय सगळ्यांना कुत्रे ,मांजरी ,पक्षी ,प्राणी आवडत नाहीत. त्यांच्यापैकी एक एक जण तिला लांब कुठेतरी सोडून आला, का तर शूटिंगच्या मध्ये मध्ये यायची म्हणून, त्यांना disturb व्हायचं. These are the realities of life… पण मग हल्ली अनिरुद्ध खूपच डोक्यात जातो आणि बाहेर यायचं नावच घेत नाही’.
मालिकेला एक रंजक वळण द्यायला अशी पत्रे कलाकारांना साकारावी लागतात. यामुळे अनेकदा प्रेक्षकांचा रोषदेखील त्यांना पत्करावा लागतो. पण अशा भावनांमधूनच कलाकाराला कामाची पोचपावती मिळत असते. आता अनिरुद्धची भूमिका पाहता कधी तो भेटला आणि त्याला सणसणीत लगावण्याची इच्छा झाली नाही तर नवलच. पण मुळात भूमिका साकारणारी व्यक्ती आपल्या स्वभावाच्या विरुद्ध वागत असताना ती स्वतः किती त्रासातून जात असते हेच मिलिंद यांच्या पोस्टमधून समजतं.
Discussion about this post