हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतचा आगामी चित्रपट ‘इमर्जन्सी’ सध्या सोशल मीडियावर खूपच चर्चेत आहे. या चित्रपटात देशातील ‘आणीबाणी’ या अत्यंत मोठ्या राजकीय घटनेवर भाष्य केले जाणार आहे. मुख्य म्हणजे या चित्रपटात स्वतः कंगना भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आव्हानात्मक भूमिका साकरणार आहे.
शिवाय अन्य महत्वाच्या भूमिकांवरूनही हळूहळू पडदा उघडतो आहे आणि चाहत्यांना सरप्राईज मिळत आहे. अभिनेते अनुपम खेर, श्रेयस तळपदे, महिमा चौधरी यांच्यानंतर आता अभिनेता आणि हॉट मॉडेल मिलिंद सोमण याचीही ‘इमर्जन्सी’ चित्रपटात एंट्री झाली आहे.
अभिनेत्री कंगना रनौतने अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्राम हॅण्डलवरून या चित्रपटाचे नवे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये अभिनेता मिलींद सोमण एका अत्यंत महत्वाच्या भूमिकेत दिसतो आहे. या चित्रपटात मिलिंद सोमण हा ‘सॅम माणेकशॉ’ यांची भूमिका साकारणार आहे. सॅम माणेकशॉच्या व्यक्तिरेखेतील हा त्याचा फर्स्ट लूक आहे जो प्रेक्षकांसमोर आला आहे.
हे पोस्टर शेअर करत कंगनाने लिहिले आहे कि, ‘भारत-पाक युद्धादरम्यान भारताची सीमा वाचवणारा आणि ज्याची सेवा त्याच्या प्रामाणिकपणाइतकीच प्रतिष्ठित होती अशा व्यक्तीला #SamManekshaw म्हणून डायनॅमिक @milindrunning सादर करत आहे. एक मोहक, एक युद्ध नायक आणि #इमर्जन्सी मध्ये एक दूरदर्शी नेता’
सध्या सोशल मीडियावर मिलिंद सोमण याचा लूक चांगलाच चर्चेत आला आहे. मिलिंद सोमणची शारीरिक रचना हि ‘सॅम माणेकशॉ’ यांच्या व्यक्तिरेखेसाठी साजेशी आहे. त्यामुळे मिलिंद सोमण हा ‘फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ’ यांच्या भूमिकेतून चाहत्यांची मने जिंकेल अशी आशा आहे. माहितीनुसार, सॅम माणेकशॉ हे १९७१ च्या भारत- पाकिस्तान युद्धाचे नायक होते. त्यामुळे या चित्रपटात सॅम माणेकशॉ हि भूमिका अत्यंत महत्वाची असणार आहे. आतापर्यंत या चित्रपटातील अन्य भूमिकांचे पोस्टर सोशल मीडियावर रिलीज झाले आहेत.
ज्यामध्ये अभिनेत्री कंगना रनौत भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान ‘इंदिरा गांधी’ यांच्या भूमिकेत दिसत आहे. तर अभिनेते अनुपम खेर हे या चित्रपटात दिवंगत राजकारणी ‘जयप्रकाश नारायण’ यांच्या भूमिकेत दिसत आहे.
इतकेच नव्हे तर अभिनेता श्रेयस तळपदे हा भाजप नेते आणि माजी पंतप्रधान ‘अटल बिहारी वाजपेयी’ यांची भूमिका साकरताना दिसतोय.
शिवाय अभिनेत्री महिमा चौधरी क्रांतीकारी लेखिका ‘पुपुल जयकर’ यांच्या भूमिकेत दिसते आहे. कंगनाचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट येत्या वर्षात २०२३ मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
Discussion about this post