हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | मिर्झापूर २’ या वेब सीरिजमधील एका दृश्यावरून ही वेब सिरीज वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. देशभरात प्रसिद्ध असणारे लेखक सुरेंद्र मोहन पाठक यांनी सीरिजमधल्या एका दृश्यावर आक्षेप घेतला आहे. त्यांच्या पुस्तकाला सीरिजमध्ये चुकीच्या पद्धतीने दर्शविल्याचा आरोप पाठक यांनी केली आहे. त्या दृश्यामुळे पुस्तकाच्या प्रतिमेला धक्का पोहोचत असल्याचंही त्यांनी म्हटलंय. ते दृश्य सीरिजमधून न हटविल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पाठक यांनी दिला होता. त्यानंतर आता ‘मिर्झापूर २’च्या प्रॉडक्शन हाऊसने माफी मागत संबंधित पुस्तकाचं दृश्य सीरिजमधून हटवणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
धब्बा’ या हिंदी कादंबरीचे लेखक सुरेंद्र मोहन पाठक यांनी वेब सीरीजमधील एका दृश्यावर आक्षेप घेतला होता. एका दृश्यादरम्यान ‘धब्बा’ या कादंबरीचा चुकीचा वापर दाखवला गेला आहे,. जर, त्वरित हे दृश्य हटवले नाही तर, मालिकेचे निर्माते आणि अभिनेते कुलभूषण खरबंदा यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला होता.
या वादानंतर एक्सेल एंटरटेन्मेंटने सीरिजमधून ते दृश्य हटविण्यात येणार असल्याचं सांगत सोशल मीडियावर माफिनामा प्रसिद्ध केला. तुमच्या प्रतिमेला नुकसान पोहोचवण्याचा आमचा हेतू अजिबात नव्हता, असं त्यांनी माफिनाम्यात स्पष्ट केलं आहे. त्याचप्रमाणे तीन आठवड्यांत संबंधित दृश्यात बदल करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’