हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। भारतात कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. संपूर्ण देशात रोज विविध ठिकाणी नवे रुग्ण सापडत आहेत. आधी हजार तर आता लाखांहून अधिक रुग्णसंख्या वाढत आहे. अगदी सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. बॉलिवूड सुपरस्टार व भाजपा नेते मिथुन चक्रवर्ती यांनाही कोरोनाची लागण झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. मात्र काही तासांतच ही बातमी अफवा असल्याचे सिद्ध झाले.
काल दुपारी मिथुन चक्रवर्ती यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी आली. सोशल मीडियावर ही बातमी क्षणार्धातच व्हायरल झाली. मिथुन चक्रवर्ती होम क्वारंटाइनमध्ये असल्याचा दावाही या बातमीत सर्रास करण्यात आला होता. मात्र सरतेशेवटी ही बातमी खोटी असल्याचे सिद्ध झाले. खुद्द मिथुन यांनी ही अफवा असल्याचे स्पष्ट केले आणि या वाहत्या बातमीस रोख लागला. मी तर सुट्टी एन्जॉय करतोय… फिल्मफेअरशी बोलताना मिथुन यांनी कोरोना लागण झाल्याचे स्पष्टपणे नाकारले. मला अजिबात कोरोना वगैरे झालेला नाही़ मी तर सुट्टी एन्जॉय करतोय. महिनाभरापासून पश्चिम बंगालमध्ये प्रचार केल्यानंतर आता मी बेउली दाळ व आलू पोस्टो खात मजेत सुट्टी घालवतोय, असे त्यांनी स्पष्ट केले.
भाजप पक्षातील प्रवेशानंतर गेल्या महिनाभरापासून मिथुन चक्रवर्ती पश्चिम बंगाल येथे निवडणूक प्रचार करत होते. मिथुन चक्रवर्ती यांनी दोन महिन्यांपूर्वीच भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. कोलकाता येथील ब्रिगेड परेड मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोठी यांच्या सभेदरम्यान मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपचे कमळ हाती घेतले होते.
Discussion about this post