हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोशल मीडियावर आपल्या हटके स्टाईल आणि किलर अदाकारीसाठी गौतमी पाटील प्रचंड चर्चेत असते. ती करत असलेल्या नृत्याला बरेच लोक लावणी असं म्हणतात. पण मूळ लावणी सम्राज्ञीचं तिच्या या नृत्यावर आक्षेप घेताना दिसल्या. यातच आता तिच्या अश्लील नृत्याबाबत मनसेनेही संताप व्यक्त केला आहे.
अश्लील हावभाव, चावट चाळे, अर्धवट साडी अशा प्रकाराला ‘लावणी’ म्हणत नाहीत असे स्पष्ट लावणी कलावंत सम्राज्ञी सुरेखा पुणेकर तसेच मेघ घाडगे यांनी म्हटले आहे. तरीही तिची एकही तारीख रिकामी जात नाही एव्हढं तिने सगळ्यांना वेड केलं आहे. याबाबत आता मनसे मात्र चांगलीच आक्रमक झाली आहे.
सांगलीच्या बेडगमध्ये गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमात प्रेक्षकांनी घातलेला हैदोस, मृतदेह हे प्रकरण सोशल मीडियावर चर्चेत राहिलं. अनेक स्तरातून यावर टीकादेखील झाली. प्रसिद्ध लावणी कलाकारांनी तिला कडक इशारादेखील दिला होता. मात्र सबसे कातिल गौतमी पाटील काही थांबेनाच.
यातच आता मनसेनं उडी घेत तिच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. गौतमी पाटील हिच्या अश्लिल नृत्याला आवर घाला नाहितर गृहमंत्रालय कार्यालयाच्या काचा फोडू, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने दिला आहे. जालन्यातील सेवली पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या माध्यमातून पोलीस महासंचालकांकडे हि तक्रार दाखल करण्यात आली आहे.
या संपूर्ण प्रकरणासंदर्भात मनसे विद्यार्थी सेनेने पत्र दिलं आहे. ज्यामध्ये लिहिले आहे कि, ‘गौतमी पाटील ही हेतू पुरस्पर अश्लिल हावभाव करत डान्स करते. याचे व्हिडिओ तयार करुन सोशल मीडियावर व्हायरल करुन व अश्लीलरित्या अंग प्रदर्शन करून हावभाव करते.
यामुळे महाराष्ट्रात अश्लीलतेचं वातावरण निर्माण होत आहे. याचे वाईट परिणाम राज्यातील तरुणांवर होत आहेत. त्यामुळे गौतमी पाटील हिच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी’. अशी मागणी या पत्राद्वारे मनसे विद्यार्थी सेनेने केली आहे.
Discussion about this post