हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। एस एस राजामौलींच्या ‘बाहुबली’ या चित्रपटातून अभिनेता प्रभास याला एक वेगळी आणि विशेष ओळख मिळाली. आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये प्रभासचे नाव टॉप ५ मध्ये घेतले जाते. त्यामुळे या चित्रपटानंतर प्रेक्षकांच्या प्रभासकडून अपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून आले आहे. दरम्यान अगदी पहिल्या पोस्टरपासून चर्चेत असलेला ‘राधेश्याम’ हा चित्रपट प्रभाससाठी पदरी अपयश घेऊन आला. या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत उत्सुक असलेल्या चाहत्यांनी म्हणावा तितका प्रतिसाद न दिल्यामुळे हा चित्रपट फार काही कमाई करू शकला नाही. तर असे का झाले..? याबाबत बोलताना प्रभासने आपले मत व्यक्त केले आहे.
राधेश्याम चित्रपट म्हणावं तितकं का कमाऊ शकला नाही किंवा तो का फ्लॉप गेला याविषयी बोलताना प्रभासने सांगितले कि, “एस. एस. राजामौली यांनी माझी लार्जर दॅन लाइफ बाहुबलीची इमेज तयार केली. यामुळे माझ्या काही चाहत्यांना मला तशाच पद्धतीच्या भूमिकेत पहायच आहे. प्रेक्षकांनी बाहुबलीला जसा प्रतिसाद दिला, तसाच प्रतिसाद माझ्या इतर चित्रपटांनाही मिळावा यासाठी माझ्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांवर नेहमीच खूप दबाव असतो. माझ्यावर मात्र तसा काही दबाव नाही.
बाहुबलीसारखा चित्रपट मला मिळाला हे माझं नशिब आहे. पण मला इतरही भूमिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करायचं आहे. परंतु राधेश्यामला अपेक्षित असा प्रतिसाद न मिळण्यामागचं कारण कदाचित कोविड असू शकतं वा कदाचित आम्ही स्क्रिप्टमध्ये काही गोष्टींकडे दुर्लक्ष केलं असेल. खरतर याबद्दल प्रेक्षकच स्पष्ट सांगू शकतील. कदाचित मला तशा भूमिकांमध्ये त्यांना पहायचंच नसेल वा जरी पहायचं असेल तरी त्यांच्या अपेक्षा माझ्याकडून खूप असतील.
यापुढे बोलताना प्रभास म्हणाला कि, मला “मला हिंदू भाषेसाठी आणखी प्रयत्न करावे लागतील. साहो ते राधेश्यामपर्यंत माझ्यात बरीच सुधारणा झाली आहे. पण मला हिंदी भाषेवर पूर्ण प्रभुत्व मिळवण्याची गरज आहे”. कदाचित प्रेक्षकांच्या नाराजीचे हे सुद्धा एक कारण असू शकते. असे प्रभासने सांगितले. ‘राधेश्याम’ या चित्रपटामध्ये प्रभासने एका ज्योतिषाची भूमिका साकारली होती. मात्र खऱ्या आयुष्यात त्याचा यांपैकी कोणत्याही गोष्टींवर विश्वास नसल्याचे तो म्हणाला आहे. याबाबत बोलताना प्रभासने सांगितले कि, “ज्योतिषासंबंधित मी अनेक रंजक कथा ऐकल्या आहेत. मात्र मी माझा हात कधीच कोणाला दाखवला नाही.” तूर्तास राधेश्याम चित्रपटाला भले मनाजोगते यश मिळाले नसेल. पण प्रभासचे तीन चित्रपट प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहेत. यामध्ये ‘आदिपुरुष’, ‘सलार’ आणि ‘प्रोजेक्ट के’ हे चित्रपट आहेत. आता हे चित्रपट प्रेक्षकांच्या किती पसंतीस उतरतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
Discussion about this post