Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अखेर प्रतिक्षा संपली! लोकप्रिय वेबसिरीज ‘द फॅमिली मॅन’चा तिसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 7, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, वेबसिरीज, सेलेब्रिटी
The Family Man 3
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता मनोज बाजपेयी हा बॉलिवूड सिनेसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक अभिनेता आहे. त्याने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये एकापेक्षा एक भूमिका साकारल्या आहेत. पण तो लोकप्रिय अभिनेता होण्यामागे त्याच्या ‘ द फॅमिली मॅन’ या वेबसीरिजचा मोठा हात आहे. ‘द फॅमिली मॅन’ या वेबसीरिजने वेब विश्व प्रचंड गाजवले आहे. आतापर्यंत ‘द फॅमिली मॅन’ या वेब सिरीजचे दोन सीजन येऊन गेले आहेत. मुख्य म्हणजे हे दोन्ही सिजन प्रचंड गाजले आहेत. यानंतर प्रेक्षकांना प्रतिक्षा होती ती ‘द फॅमिली मॅन 3’ ची आणि आता हि प्रतिक्षा संपली आहे. हि वेबसिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

View this post on Instagram

A post shared by Thefamilyman_telugu (@thefamilyman_telugu)

‘द फॅमिली मॅन’चे आतापर्यंतचे दोनही भाग प्रचंड गाजले आहेत. यानंतर आता ‘द फॅमिली मॅन’ चा तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. राज निदिमोरू, कृष्णा डी.के आणि सुमन कुमार यांनी या सीरिजचे लेखन केले आहे. शिवाय त्यांनीच दिग्दर्शन देखील केले आहे. तर या वेब सीरिजमध्ये मुख्य भूमिकांमध्ये मनोज वायपेयी, प्रियामणी, शारीब हाशमी आणि श्रेया धनवंतरी हे कलाकार दिसत आहेत. ‘द फॅमिली मॅन’च्या दुसऱ्या सीझनमध्ये आगामी तिसऱ्या सीझनविषयी चाहूल देण्यात आली होती. दुसऱ्या सिजनने आधीच आगामी तिसऱ्या सीझनविषयी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण केली होती. अखेर आता प्रतीक्षा संपली असे म्हणता येईल. कारण ‘द फॅमिली मॅन’चा तिसरा सीजन याच वर्षाच्या शेवटी येणार अशी माहिती देण्यात आली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, ‘द फॅमिली मॅन’ चा आगामी तिसरा सिजन या वर्षाच्या नोव्हेंबर महिन्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. रिपोर्टप्रमाणे, २०१९ साली अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर ‘द फॅमिली मॅन’चा पहिला सीझन प्रदर्शित झाला. त्यानंतर काहीच काळात ‘द फॅमिली मॅन’चा दुसरा सीजन रिलीज झाला. या दोन्ही सीझनने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. यामध्ये शारीब हाश्मी, प्रियामणी, श्रेया धन्वंतरी आणि शरद केळकर हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसले होते. तर दुसऱ्या सीझनमध्ये साऊथची अभिनेत्री समंथा रुथ प्रभू अनोख्या भूमिकेत दिसली होती. पण आता तिसऱ्या सीझनमध्ये कोणते कलाकार दिसणार आहेत..? याबाबत मोठी उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. पण तूर्तास आनंदाची बाब अशी कि लवकरच हा सीजन येतोय.

Tags: Instagram PostThe Family ManTrending Webseriesviral postwebseries
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group