Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘देवयानी’ फेम शिवानी सुर्वे येतेय बत्तीशी घशात घालायला; नव्या सिनेमातला नवा लूक पाहिला का..?

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 24, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Shivani Surve
0
SHARES
82
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। छोट्या पडद्यावरील देवयानी ही मालिका सुपर डुपर हिट मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील देवयानी आणि संग्रामने सगळ्यांचं मन जिंकलं होत आणि प्रेक्षकांच्या मनात आपली हक्काची जागा निर्माण केली होती. ‘तुमच्यासाठी काय पण’ हा या मालिकेतील डायलॉग तर आजही हिट आहे. या मालिकेतून प्रकाश झोतात आलेली अभिनेत्री शिवानी सुर्वे तर तिच्या नावापेक्षा देवयानी म्हणूनच आजही ओळखली जाते. यानंतर आता शिवानी लवकरच बत्तीशी घशात घालणारी सुंदर डेंटिस्ट होऊन प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाली आहे.

View this post on Instagram

A post shared by ZeeStudios (@zeestudiosmarathi)

झी स्टुडिओज आणि दिग्दर्शक परेश मोकाशी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला एक नवीकोरी आणि अत्यंत रंजक अशी कलाकृती घेऊन येत आहेत. आपण ‘दिसतं तसं नसतं’ अशी हटके टॅगलाईन असलेल्या ‘वाळवी’ या चित्रपटाबद्दल बोलत आहोत. चित्रपटाचे शीर्षक, पोस्टर, टिझर यानंतर आता चित्रपटात मुख्य भूमिका साकारत असलेल्या कलाकारांच्या भूमिकेवरील पडदा उघड होतो आहे. या चित्रपटात अभिनेत्री शिवानी सुर्वे देखील अत्यंत महत्वपूर्ण अशा मुख्य भूमिकेत आहे. आपल्या भूमिकेचे मोशन पोस्टर शिवानीने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर शेअर केले आहे. सोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘तुमची बत्तीशी घशात घालेल. ही आहे सुंदर डेंटिस्ट शिवानी सुर्वे.. हिच्याबद्दल आणखीन कळेल लवकरच. ‘वाळवी’ १३ जानेवारी २०२३ पासून सर्वत्र प्रदर्शित.’

View this post on Instagram

A post shared by Shivani Surve (@iam_shivanisurve)

अद्याप ‘वाळवी’ हा चित्रपट रोमँटिक आहे की बायोपिक, कॉमेडी आहे की फॅमिली ड्रामा हे गुलदस्त्यात आहे. पण दिग्दर्शक परेश मोकाशी यांनी आपल्या या नव्या कोऱ्या चित्रपटात अभिनय करणाऱ्या कलाकारांना त्यांच्या मूळ व्यक्तिरेखेचा अगदी उलट अशा भूमिका दिल्या आहेत हे पोस्टरवरून समजत आहे. या चित्रपटात सुबोध भावे, स्वप्नील जोशी, शिवानी सुर्वे, अनिता दाते हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसत आहेत. पण अजूनही चित्रपटाचे नाव ‘वाळवी’ असे का आहे..? आणि या चित्रपटात नक्की काय कथानक दर्शविले आहे..? याबाबत उत्सुकता कायम आहे.

Tags: Anita DateInstagram PostShivani Survesubodh bhaveswapnil joshiUpcoming Marathi MovieVaalviViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group