Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘तवाफ्राय प्रेमाची रवाफ्राय लव्हस्टोरी’; नव्या वर्षात ‘जग्गू आणि जुलिएट’ येतायत प्रेक्षकांच्या भेटीला

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 28, 2022
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Jaggu Juliet
0
SHARES
2k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीत आजपर्यंत आपण अनेक लव्हस्टोरी पाहिल्या असतील. काही हिट तर काही फ्लॉप झाल्या असतील. पण तुम्ही तवाफ्राय प्रेमाची रवाफ्राय लव्हस्टोरी पाहिली आहे का..? नाही ना… म्हणूनच पुनीत बालन स्टुडिओ येत्या नव्या वर्षात प्रेक्षकांसाठी एक खरपूस रावस लव्हस्टोरी घेऊन येत आहे. येत्या २०२३ च्या फेब्रुवारीत या लव्हस्टोरीची एक खास गोड भेट तुम्हाला दिली जाणार आहे. या चित्रपटाचे नाव आहे ‘जग्गू आणि ज्युलिएट’. तर या नव्या कोऱ्या चित्रपटातून पुन्हा एकदा अमेय वाघ आणि वैदेही परशुरामी यांची भन्नाट जोडी एकत्र मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज झाला असून सोशल मीडियावर चर्चेत आहे.

View this post on Instagram

A post shared by Punit Balan Studios (@punitbalanstudios)

पुनीत बालन स्टुडिओ निर्मित आणि महेश लिमये दिग्दर्शित ‘जग्गू आणि ज्युलिएट’ हा नवा कोरा चित्रपट येत्या नव्या वर्षात १० फेब्रुवारी २०२३ रोजी सर्वत्र चित्रपट गृहात प्रदर्शित होणार आहे. मुख्य म्हणजे या चित्रपटाला महाराष्ट्राची लाडकी जोडी अजय- अतुल याचे संगीत लाभले आहे. तर लेखन आणि सहदिग्दर्शन गणेश पंडित यांचे आहे. शिवाय चित्रपटातील मुख्य भूमिकेत अभिनेता अमेय वाघ आणि अभिनेत्री वैदेही परशुरामी दिसणार आहे. याआधी ‘झोंबिवली’ चित्रपटात ते एकत्र दिसले होते. त्यांच्या जोडीला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाल्यानंतर आता पुन्हा एकदा ते आपल्या भेटीस यायला सज्ज आहेत.

View this post on Instagram

A post shared by Amey Wagh (@ameyzone)

सोशल मीडियावर ‘जग्गू आणि ज्युलिएट’ चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. त्यामध्ये एका बाईकवर हे दोघे फुल्ल स्पीडमध्ये दिसत आहेत. डोळ्यावर गॉगल, हातात सोन्याचं ब्रेसलेट, गळ्यात रिच नावाचं पेंडंट बोले तोह जग्गू एकदम मालदार पार्टी दिसतोय.

View this post on Instagram

A post shared by Vaidehi Parashurami (@parashuramivaidehi)

तर ज्युलिएट मस्त बिंधास्त, हवेत मोकळे उडणारे केस, गालावर खळी, डोळयावर गॉगल आणि गाडी चालवताना दिसतेय. हे पोस्टर पाहून हि धमाल जोडी चित्रपटात नक्की काय कमाल करणार आहे याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटात अमेय आणि वैदेही व्यतिरिक्त प्रवीण तरडे, ह्रषीकेश जोशी, उपेंद्र लिमये, जयवंत वाडकर, मनोज जोशी, समीर धर्माधिकारी, अविनाश नारकर, सविता मालपेकर, अभिज्ञा भावे, समीर चौघुले अशी तगडी स्टारकास्ट आहे.

Tags: Amey waghInstagram PostPunit BalanUpcoming Marathi MovieVaidehi Parshurami
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group