हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। समाजाचे दिशादर्शक आणि स्त्री शिक्षणाचा पाया रचणारे महात्मा ज्योतिराव फुले यांची यांची आज जयंती. या निमित्त फुले यांच्या आयुष्यावर आधारित ‘सत्यशोधक’ या चित्रपटाचे टिझर पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. चित्रपटाचे टिझर पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आले असून त्यासोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘संवेदनहीन अज्ञानाच्या रात्रीला संपवायला उगवला आहे एक अथांग ज्ञानाचा क्रांतिसूर्य.. ‘सत्यशोधक’ क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! सादर करीत आहोत ‘सत्यशोधक’ सिनेमाचे टिझर पोस्टर’. सोशल मीडियावर या चित्रपटाचे टिझर पोस्टर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
या चित्रपटाच्या टिझर पोस्टरमध्ये म्हटलं आहे कि, ‘अनंत काळाच्या गर्भातून आलेली ती गुलामी होती, धर्माच्या मुजोरीतून एकाने लादलेली आणि दुसऱ्याने स्वीकारलेली. ती एक संवेदनहीन व्यवस्था होती. तिला स्त्री म्हणून तुडवणारी आणि त्याला शूद्र म्हणून हिणवणारी तर कधी इथल्याच भूमिपुत्राला मातीत गाडणारी. कधीही न संपणारी रात्र होती मग एक सूर्य क्रांतीचा अंधाराला चिरत आला तो वंश वेळीचा नवा युगाचे वध घेऊन आला, मानवतेचा बोध देऊन गेला. असत्यावर मात करुनी एक सत्यशोधक आला.’
‘सत्यशोधक’ या मराठी चित्रपटात अभिनेते संदीप कुलकर्णी हे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याआधी संदीप यांनी अनेक लोकप्रिय चित्रपटात काम केले असून ‘डोंबिवली फास्ट’ या चित्रपटातील त्यांची भूमिका प्रचंड गाजली. शिवाय ‘दुनियादारी’ या चित्रपटातदेखील त्यांनी पाहुणे कलाकार म्हणून एक छोटीशी मात्र महत्वपूर्ण भूमिका साकारली होती. यानंतर आता ते महात्मा ज्योतिराव फुले यांची भूमिका साकारताना दिसणार आहेत. या चित्रपटाची हि पहिली झलक येताच प्रेक्षकही संदीप यांना फुलेंच्या भूमिकेत पाहण्यासाठी आतुर झाले आहेत.
Discussion about this post