Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘बाईपण भारी देवा’चं मोशन पोस्टर रिलीज; सामान्य आयुष्य जगणाऱ्या असामान्य स्त्रियांची गोष्ट

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 19, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Baipan Bhari Deva
0
SHARES
18
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय दिग्दर्शक केदार शिंदे हे लवकरच प्रेक्षकांसाठी एक धम्माल आणि भारी चित्रपट घेऊन येत आहेत. सामान्य आयुष्य जगणाऱ्या असामान्य स्त्रियांची हि गोष्ट असणार आहे आणि या चित्रपटाचे नाव आहे ‘बाईपण भारी देवा’. नुकतेच या चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज झाले असून याची रिलीज डेट देखील जाहीर करण्यात आली आहे. हा कमाल कथानक असणारा धमाल चित्रपट येत्या वर्षातील पहिल्याच महिन्यात अर्थात ६ जानेवारी २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे मोशन पोस्टर पाहून चित्रपटात काय काय पाहायला मिळणार याबाबतची उत्सुकता आणखीच वाढली आहे.

View this post on Instagram

A post shared by Kedar Shinde (@kedaarshinde)

आई, आजी, पत्नी, बहीण, सासू, मावशी..आपल्या आयुष्यात असलेल्या या सर्व महत्वाच्या स्त्रियांवर आधारित आणि त्यांना समर्पित असा हा चित्रपट आहे. ‘घे डबल’ आणि ‘गोदावरी’ या उत्तम कलाकृतींनंतर जिओ स्टुडिओजने त्यांच्या सलग तिसऱ्या चित्रपटाची घोषणा करीत रिलीज देत जाहीर केली आहे. ‘बाईपण भारी देवा’च्या या चित्रपटाची निर्मिती MVB Media च्या माधुरी भोसले यांनी केली आहे. तर बेला शिंदे आणि अजित भुरे हे सह-निर्माते आहेत. या चित्रपटात अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी, दीपा परब, शिल्पा नवलकर आणि सुचित्रा बांदेकर अशा ६ तोडीच्या अभिनेत्री धमाल करताना दिसणार आहेत.

View this post on Instagram

A post shared by Kedar Shinde (@kedaarshinde)

हि गोष्ट या ६ बहिणींची आहे. काही कारणांमुळे एकमेकांपासून दूर झालेल्या आणि त्याचसोबत कौटुंबिक, वैयक्तिक, आर्थिक अशा सर्व समस्या समर्थपणे पार पाडणाऱ्या या बहिणी आपल्याला काय सांगू इच्छितात ते चित्रपट पाहिल्यावरच कळेल. या चित्रपटाबाबत बोलताना केदार शिंदे म्हणाले कि, ‘आपल्या सर्वांच्या दररोजच्या आयुष्यात अशा स्त्रिया आहेत ज्या अशा महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात, परंतु आपणच कळत नकळतपणे त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असतो. ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट अशाच महिलांना समर्पित आहे.

View this post on Instagram

A post shared by Sukanya Kulkarni Mone (@sukanyamoneofficial)

या सहा बहिणींची ही गोष्ट सर्वांना नक्कीच आवडेल. आणि नवीन वर्षाची सुरुवात एका आशादायी आणि आनंदाने होईल याची मला खात्री आहे. आई, आजी, बहिण, पत्नी, मुलगी, काकू, आत्या, मावशी… अशी अनेक जिव्हाळ्याची नाती. मी सुज्ञ झालो तो यांच्याच संस्काराने. ‘अगं बाई अरेच्चा’ सिनेमा करताना स्त्रीयांच्या मनातल्या गोष्टी ऐकण्याचा प्रयत्न केला. आणि ‘बाईपण भारी देवा’ या सिनेमात त्यांच्या अंतर्मनात डोकावण्याचा प्रयत्न केला आहे.’

Tags: Baipan Bhaari DevaInstagram PostKedar shindeMotion PosterUpcoming Marathi MovieViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group