Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘धगधगत्या अग्नीतून नव्या युगाचा प्रारंभ..’; प्रसाद ओकच्या आगामी चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 27, 2023
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Parinirvan
0
SHARES
61
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्यायमंत्री, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर. दलितांचा उद्धारकर्ता अशीही त्यांची ओळख आहे. त्यांचे एकंदरीत जीवन पाहता, आयुष्य मोठे असण्यापेक्षा महान असायला हवे! ही ओळ त्यांना अतिशय अनुरूप ठरते. अशा या ‘महामानवा’ने ६ डिसेंबर १९५६ रोजी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अखेरच्या दर्शनाकरता व अंत्ययात्रेत सहभागी होण्याकरता प्रचंड प्रमाणात जनसागर उसळला होता. या मन हेलावणाऱ्या क्षणाचा एक असा साक्षीदार आहे, जो विषमतेच्या वणव्याला न जुमानता, अनेकांना प्रेरणा देत, डौलाने घट्ट उभा राहिला. अशा या महावृक्षाच्या परिनिर्वाणाची गोष्ट आपल्याला आता मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

View this post on Instagram

A post shared by PRASAD OAK : प्रसाद ओक (@oakprasad)

कल्याणी पिक्चर्स प्रस्तुत, कल्याणी पिक्चर्स आणि अभिता फिल्म्स प्रॅाडक्शन निर्मित ‘परिनिर्वाण’ हा चित्रपट एका अशा व्यक्तिमत्वावर आधारित आहे, ज्याने आपल्या ‘नॅशनल हिरो’साठी एक असामान्य पाऊल उचलले. नामदेव व्हटकर असे या सामान्य व्यक्तिमत्वाचे नाव असून ही व्यक्तिरेखा प्रसाद ओक साकारणार आहेत. नुकत्याच एका भव्य सोहळ्यात ‘परिनिर्वाण’च्या मोशन पोस्टरचे अनावरण करण्यात आले. या सोहळ्याल चित्रपटाच्या इतर टीमसोबतच नामदेव व्हटकर यांचे कुटुंबीयही उपस्थित होते. यावेळी नामदेव व्हटकर यांच्या आयुष्यावरील चित्रफितही दाखवण्यात आली. तसेच नामदेव व्हटकर यांनी टिपलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निर्वाण यात्रेची आणि गर्दीची क्षणचित्रंही याठिकाणी उपस्थितांना पाहण्यासाठी ठेवण्यात आली होती.

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

शैलेंद्र कृष्णा बागडे दिग्दर्शित या चित्रपटाचे सुनिल शेळके निर्माता आहेत तर आशिष ढोले सहनिर्माता आहेत. यात प्रसाद ओक यांच्यासोबत प्रमुख भूमिकेत अंजली पाटील असून रोहन – रोहन यांचे या गाण्याला संगीत लाभले आहे. या प्रसंगी एका परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यात पत्रकार सौमित्र पोटे, प्रसाद ओक आणि जयवंत व्हटकर यांचा सहभाग होता. ‘परिनिर्वाण’चे मोशन पोस्टर अंगावर अक्षरशः शहारा आणणारे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची परिनिर्वाण महायात्रा नामदेव व्हटकर यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केली. चित्रीकरणाच्या उद्देशाने झपाटलेला हा एकमेव अवलिया आहे, ज्यांच्याकडे या महायात्रेचे दुर्मिळ चित्रीकरण आहे. नामदेव व्हटकर हे केवळ छायाचित्रकारच नसून ते लेखक, संगीतकार, कुशल प्रशासक, लोककलेचे अभ्यासक, प्रगतीशील शेतकरी, स्वातंत्र्य सैनिक, जागरूक आमदारही होते.

Tags: Instagram PostMotion PosterPrasad OakUpcoming Marathi MovieViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group