Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘1770’ चे मोशन पोस्टर रिलीज; बंकिमचंद्र यांच्या कादंबरीवर आधारित संन्यासी विद्रोह

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 18, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
1770
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपल्या भारताने यंदा स्वातंत्र्याची ७५ वर्ष पूर्ण केली. हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कित्येकांनी प्राणांची आहुती दिली. असा हुतात्म्यांचा इतिहास आपल्याला ठाऊक असणे आवश्यक आहे. म्हणूनच निर्माते शैलेंद्र केकुमार, सुजय कुट्टी, कृष्ण कुमार बी आणि सूरज शर्मा यांनी बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या ‘आनंदमठ’ या बंगाली कादंबरीवर आधारित सिनेमा तयार केला आहे. मुख्य म्हणजे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून या चित्रपटाचे पहिले पहिले मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या चित्रपटाचे नाव आहे ‘1770’

View this post on Instagram

A post shared by Monster view (@monster_view_54)

‘1770’ या चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियाच्या माध्यमातून रिलीज करण्यात आले आहे. हा चित्रपट हिंदी, तेलगू, तामिळ, कन्नड, मल्याळम आणि बंगाली अशा ६ विविध भाषांमध्ये एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहे. एस. एस.1 एंटरटेनमेंट आणि पी के एंटरटेनमेंट यांच्या बॅनरखाली ‘1770’ या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. या बहुभाषिक चित्रपटाचे दिग्दर्शन सुप्रसिद्ध दिग्दर्शक अश्विन गंगाराजू यांनी केले आहे. याआधी एस एस राजामौली यांच्या ‘एग्गा‘ आणि ‘बाहुबली‘ या दोन्ही चित्रपटांसाठी त्यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. यानंतर ‘1770’ या चित्रपटासाठी ते मुख्य दिग्दर्शक म्हणून काम पाहत आहेत. त्यामुळे हि मोठी संधी आहे असे ते म्हणाले.

View this post on Instagram

A post shared by OCD TIMES (@ocdtimes)

आपल्या आगामी चित्रपटाविषयी भावना व्यक्त करताना अश्विन गंगाराजू म्हणाले कि, ‘हा विषय माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होता. पण दिग्गज व्ही विजयेंद्र प्रसाद यांनी रूपांतरित कथा आणि पटकथा लिहिल्याने मला निश्चित वाटते आहे की, आमच्याकडे ज्या पद्धतीने हे लेखन झाले आहे तो एक ब्लॉकबस्टर सिनेमॅटिक अनुभव ठरणार आहे. ज्या कथांमध्ये विशिष्ट कालखंड दाखवणारी पार्श्वभूमी असेल, भावनांना जिथे जास्त महत्व असेल आणि जिथे ‘लार्जर दॅन लाईफ कृतीला वाव असेल अशा कथांकडे एक निर्माता म्हणून मी जास्त आकर्षित होतो.

View this post on Instagram

A post shared by inandoutcinema (@inandoutcinema)

पुढे म्हणाले कि, ‘या गोष्टीबद्दल सुरुवातीला मी थोडा साशंक होतो. पण जेव्हा मी राम कमल मुखर्जी यांच्याशी बोललो आणि त्यांचा या बद्दलचा दृष्टिकोन जाणून घेतला तेव्हा माझा आत्मविश्वास वाढला. याशिवाय चित्रपटाची पटकथा लिहिणारे भारतातील सर्वात प्रसिद्ध कथाकार व्ही विजयेंद्र प्रसाद म्हणाले कि, ‘वन्दे मातरम्’ हा एक जादुई शब्द होता असे मला वाटते. महर्षी बंकिमचंद्र यांनी राष्ट्राला जुलूम आणि अन्यायाविरुद्द लढण्याकरिता दिलेला हा एक मंत्र होता . स्वातंत्र्य चळवळीची आग पेटवणाऱ्या अनेक अज्ञात योद्धयांची कहाणी आम्ही ‘1770’ मध्ये हाताळत आहोत.’ येत्या दिवाळीपर्यंत चित्रपटातील कलाकार आणि कथानकाविषयी अन्य माहिती दिली जाणार आहे.

Tags: Instagram PostMotion PosterNew Upcoming MovieViral Poster
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group