Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘RRR’ Review । ‘रौद्रम रणम रुधिरम’बद्दल क्या बोलता है पब्लिक पोल..?; लगेच जाणून घ्या

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 30, 2022
in फिल्म रिव्हिव्ह, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
RRR
0
SHARES
4
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। एस. एस. राजामौली यांचा बहूचर्चित ‘रौद्रम रणम रुधिरम’ म्हणजेच ‘RRR’ २५ मार्च २०२२ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आणि आज हा चित्रपट प्रदर्शित होऊन ५ दिवस झाले आहेत. हा चित्रपट रिलीज होण्याआधीपासूनच हिट होता आणि आता थिएटरमधील प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून ते अगदी स्पष्ट होतय. बाहुबली जितका हिट झाला त्याहून जास्त हिट होण्याच्या मार्गावर ‘रौद्रम रणम रुधिरम’ आहे. सध्या या चित्रपटाचे तेलुगू व्हर्जन समोर आले आहे. या चित्रपटाने तेलुगू प्रेक्षकांची मने ज्या पद्धतीने जिंकली आहेत ते पाहता इतर भाषांमध्ये हा चित्रपट कधी रिलीज होतोय इतकीच प्रतीक्षा आहे. कारण चित्रपटाच्या अगदी पहिल्या सीनपासून नुसत्या शिट्ट्या, टाळ्या आणि पैशाचा पाऊस पडताना पाहायला मिळाले आहे.

हा चित्रपट सुमारे ८ हजार स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षकांसह समीक्षकांनाही ‘आरआरआर’ हा चित्रपट भावला आहे. या चित्रपटामध्ये दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण आणि ज्युनियर एनटीआर मुख्य भुमिकेत आहे. तर बॉलिवूड कलाकार अजय देवगण आणि आलिया भट्ट यांनीही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे फक्त साऊथ नाही तर बॉलिवूडदेखील या चित्रपटाच्या यशात सामील आहे. आता हा चित्रपट पहावा का नाही असा कोणता प्रश्नच उरलेला नाही. याचे कारण म्हणजे चित्रपटाचे जबरदस्त कथानक, कलाकारांचा अव्वल अभिनय, कमालीचे डायलॉग आणि मन मोहणारी गाणी… बस और क्या चाहिये..?

View this post on Instagram

A post shared by SS Rajamouli (@ssrajamouli)

दरम्यान प्रेक्षकांनी तर RRR चित्रपटाला १०० पैकी १०० गूण देऊन पास केले आहे. तर रेटिंगमध्ये टॉलीवूडमधील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणून RRR सिद्ध झाला आहे. या चित्रपटाला पब्लिक पोर्टलनुसार ५ स्टारचे रेटिंग मिळाले आहे. भारतीय बॉक्स ऑफिससाठी या चित्रपटाने एक नवीन रेकॉर्ड केला आहे. या चित्रपटाला IMDb ने १० पैकी ९.२ स्टार दिले असल्यामुळे हा चित्रपट सुपर हिट चित्रपटांच्या यादीत सेट झाला आहे. या चित्रपटात भारतीय इतिहासातील ‘अल्लुरी सीताराम राजू’ आणि ‘कोमाराम भीम’ या दोन वास्तविक जीवनातील नायकांच्या जीवनाचे भाष्य केले आहे. ही दोन नावे अशी आहेत जी भारतीय इतिहासात सापडली नाहीत तरीही महत्वाची आहेत.

View this post on Instagram

A post shared by SS Rajamouli (@ssrajamouli)

या चित्रपटाचे कथानक इतिहासातील ते पण उघडते जे पण कुणाला फारसे ठाऊक नाही. यातील अल्लुरी सीताराम राजू यांचा जन्म १८५७ रोजी विशाखापट्टणम येथे झाला. वयाच्या १८ व्या वर्षी त्यांनी संसारिक जीवनातून संन्यास घेतला आणि मुंबई, वडोदरा, बनारस, ऋषिकेश अशा अनेक शहरांत प्रवास केला. अल्लुरी सीताराम राजू यांच्यावरही महात्मा गांधींच्या विचारांचा प्रभाव होता. त्यांनी १९२०दरम्यान आदिवासींना दारू सोडण्याचा आणि पंचायतीमध्ये त्यांचे प्रश्न सोडवण्याचा सल्ला दिला. तोपर्यंत देश इंग्रजांच्या अत्याचाराखाली दबला होता. अल्लुरी यांच्या जीवनावर त्याचा खोल परिणाम झाला आणि त्यांनी अहिंसेचे विचार सोडून इंग्रजांविरुद्ध युद्ध सुरू केले. धनुष्य- बाण घेऊन इंग्रजांचा नायनाट करण्यासाठी ते निघाले. दरम्यान त्यांनी इंग्रजांकडून अनेक छळ सोसले. हि आव्हानात्मक भूमिका राम चरणने अव्वल निभावली आहे.

View this post on Instagram

A post shared by SS Rajamouli (@ssrajamouli)

तर कोमाराम भीम यांचा जन्म १९०१ मध्ये संकेपल्ली, हैदराबाद येथे झाला. ते गोंड समाजाचे होते. कोमाराम भीमांच्या जीवनाचे उद्देश म्हणजे गुलामगिरीच्या साखळीत अडकलेल्या भारतमातेला स्वातंत्र्य मिळवून देणे. फक्त १९ वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांना निजाम सैनिकांनी मारले. वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी भीमाने ‘निजामाला धडा शिकवायचे ठरवले. पण एकटे लढण्याची क्षमता त्यांच्यात नव्हती. त्यांच्यावर तेलंगणाचे वीर क्रांतिकारक अल्लुरी सीताराम राजू यांचा प्रभाव होता. त्याच्याप्रमाणेच त्याला देशासाठी काहीतरी करायचे होते. हि आव्हानात्मक भूमिका ज्युनिअर एनटीआरने अव्वल निभावली आहे. या दोन अत्यंत महत्वपूर्ण क्रांतिकारकांचा इतिहास अनेकांना आजही माहित नाही आणि म्हणून हा चित्रपट पाहणे आवश्यक आहे. हा चित्रपट मनोरंजन नाही तर अनुभव आणि शिकवण देणारा आहे, असे स्वतः प्रेक्षकांनी म्हटले आहे.

Tags: Jr.NTRMovie ReviewramcharanRRRS.S.RajamouliTelugu Version
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group