हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मध्य भारतातील सर्वात मोठा सांस्कृतिक उत्सव म्हणून खासदार सांस्कृतिक महोत्सवाची ख्याती आहे. यंदाचा खासदार सांस्कृतिक महोत्सव २०२१’चा उद्घाटन सोहळा आज अर्थात शुक्रवार दिनांक १७ डिसेंबर २०२१ रोजी पार पडणार आहे. सायंकाळी ०७.०० वाजता ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणात हा सोहळा पार पडेल. या सोहळ्याचे उदघाटन बॉलीवुड अभिनेता संजय दत्त अर्थात संजू बाबाच्या हस्ते होईल. या सोहळ्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व आयोजन समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह खासदार, आमदार व इतर अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
माहितीनुसार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून २०१७ साली या महोत्सवाचा प्रारंभ झाला. यामागील मुख्य हेतू असा कि, भारतीय कला व संस्कृतीचा प्रचार-प्रसार व्हावा तसेच विदर्भातील प्रतिभावान कलाकारांना एक हक्काचा आणि मोठा मंच मिळावा. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या महोत्सवात ‘चक दे इंडिया’ थीमवर गायक सुखविंदर सिंह यांचा लाईव्ह इन कॉन्सर्ट होईल. ते या महोत्सवात देशभक्तीपर गीतांच्या माध्यमातून सर्वांचे मनोरंजन करतील.
नागपुर में कला-संस्कृति का विकास हो और स्थानीय कलाकारों को विख्यात कलाकारों के साथ मंच मिले इस उद्देश्य से केंद्रीय मंत्री श्री @nitin_gadkari जी की प्रेरणा से नागपुर में 'खासदार (सांसद) सांस्कृतिक महोत्सव' का आयोजन किया जाता है। इस वर्ष महोत्सव की शुरुआत 17 दिसम्बर से हो रही है। pic.twitter.com/hEnvePPRbM
— Office Of Nitin Gadkari (@OfficeOfNG) December 16, 2021
हा सोहळा १० दिवसीय असून नागपूरकरांसाठी खास पर्वणी ठरेल. त्यामुळे सर्वानी याचा आनंद घ्यावा, असे आवाहन खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रा. अनिल सोले व पदाधिका-यांनी केले आहे. यंदा ऑनलाईन माध्यमातून घरबसल्या पासेस घेण्यासाठी नागपूरकरांनी 9158880522 या टोल फ्री क्रमांकावर मिस कॉल द्यायचा आहे. यानंतर तयार डिजिटल लिंकवर क्लिक केल्यास कार्यक्रमाचा पास घरबसल्या मोबाईलवर मिळेल.
या महोत्सवाचे स्वरूप कोविडच्या पार्श्वभूमीवर तयार केले असून आपत्ती व्यवस्थापन समितीची त्यासाठी मदत घेतली आहे. माहितीनुसार, आयोजनस्थळी दररोज ८ ते १० हजार N- 95 मास्कचे वितरण होईल. शिवाय दोन खुर्च्यांमध्ये सुरक्षित अंतर राखले असेल. तर साही प्रवेशद्वारांवर सॅनिटायझरची व्यवस्था असणार आहे. चला तर जाणून घेऊया कार्यक्रमांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे:-
० खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे वेळापत्रक
– शुक्रवार, १७ डिसेंबर २०२१
उद्घाटन व सुखविंदर सिंग यांची लाईव्ह इन कॉन्सर्ट – चक दे इंडिया
– शनिवार, १८ डिसेंबर २०२१
कैलाश खेर अँड कैलासा बँड लाईव्ह परफॉर्मन्स
– रविवार, १९ डिसेंबर २०२१
कविसंमेलन सहभाग – कुमार विश्वास, विमल त्यागी, शिखा पचौरी, विनीत कुमार आणि शंभू चौधरी
– सोमवार, २० डिसेंबर २०२१
काणेबुवा प्रतिष्ठानचा व्होकल क्लासिकल अँड लाईट क्लासिकल कार्यक्रम
– मंगळवार, २१ डिसेंबर २०२१
नॉर्थ – साऊथ जुगलबंदी
– बुधवार, २२ डिसेंबर २०२१
निराली प्रॉडक्शनचे आम्रपाली महानाट्य
– गुरुवार, २३ डिसेंबर २०२१
सांस्कृतिका उत्सव डॉ. सय्यद पाशा आणि चमूचा डान्स ऑन व्हिल्स
– शुक्रवार, २४ डिसेंबर २०२१
महाराष्ट्राची हास्य जत्रा
– शनिवार, २५ डिसेंबर २०२१
शंकर महादेवन यांचा माय इंडिया… माय म्युझिक कार्यक्रम
– रविवार, २६ डिसेंबर २०२१
राधारासबिहारी हेमामालिनी यांची नृत्यनाटिका
Discussion about this post