हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकताच ‘झी नाट्यगौरव २०२३’ पार पडला. यामध्ये प्रसिद्ध अभिनेत्री वंदना गुप्ते यांना ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मराठी रंगभूमीवर जिवंत सादरीकरण करून प्रेक्षकांच्या काळजात घर करणाऱ्या या अभिनेत्रीची पुरस्कार स्वीकारण्याची हि पहिली वेळ नव्हे. या निमित्त अभिनेत्री मुक्ता बर्वेने तिच्या ‘चारचौघी’ या नाटकातला प्रवेश सादर करून वंदना गुप्ते यांना मानवंदना दिली आहे. या नाटकात सध्या मुक्ता बर्वे साकारत असलेली ‘विद्या’ हि भूमिका एकेकाळी वंदना गुप्ते यांनी साकारली होती. नुसती साकारली नव्हती तर गाजवली होती.
या नाटकातील तो प्रवेश सादर करताना मुक्ताच्या प्रत्येक शब्दाने काळजाचा ठाव घेतला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये मुक्ता म्हणतेय, ‘आम्ही बायका घटस्फोट या प्रकाराची एवढी भीती बाळगतो, तुमच्या त्या तसल्या प्रेमप्रकरणाची एवढी धास्ती घेऊन बसतो की, त्या दडपणाखाली सगळं सत्त्व झिजून जातं रे…आणि आमच्या सारख्या शिकलेल्यांची अवस्था अजूनच वाईट…शिक्षणामुळे आलेला आधुनिक दृष्टीकोन.. तरी नवऱ्याबद्दलचा हळवेपणा…खरंतर ना आम्ही ठामपणे निर्णय घ्यायला हवेत. हो.. आणि ऐक मी तो निर्णय घेतला आहे. कोणत्याही परिस्थितीत मी घटस्फोट घेणार आहे’.
मुक्ताचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. मुक्ताच्या सादरीकरणाने भारावलेले नेटकरी म्हणाले कि, ‘अगं तू वेडी आहेस का ग मुक्ता??? कित्ती कित्ती छान केलंय!!! शब्दच सुचत नाहीत बघ…!!!’ तर आणखी एकाने म्हटले, ‘हीच खरी वस्तुस्थिती आहे आ…जास्त शिकलेले असेच विचार करतात’. आणखी एकाने म्हटले, ‘म्हणूनच तुझा अभिनय … गेली कित्येक वर्ष पाहूनही अजूनच आवडतोच आहे’
हा व्हिडीओ शेअर करताना मुक्त बर्वेने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘आयुष्यात एक अशी वेळ येते जेव्हा दुसऱ्याचं प्रेम मिळवण्यापेक्षा स्वत:चं अस्तित्व टिकवणं जास्त महत्त्वाचं होतं’. तर वंदना गुप्ते यांच्यासोबतचा एक फोटो शेअर मुक्ताने लिहिलं आहे कि, ‘डबलसीट मध्ये सासू- सून म्हणुन एकत्र होतो, रूद्रममध्ये आई- मुलगी म्हणून आणि आता ‘चारचौघी’मध्ये तर तू साकारलेली विद्या साकारते म्हणून. निमित्त कोणतंही चालेल एकत्र काम आणि मजा करतच राहू. वंदूताई तुला खूप खूप प्रेम…जशी आहेस तशीच मस्त, बिनधास्त, दिलखुलास रहा. तुझ्या एनर्जीने आम्हाला प्रेरणा देत रहा’.
Discussion about this post