Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

काय होणार आर्यन खानचं? सुटणार का लटकणार?; अडीज तासांपासून किला कोर्टात सुनावणी सुरुच

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 4, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मुंबईहून गोव्याकडे रवाना होणाऱ्या कोर्डेलिया क्रुझवर शनिवारी २ ऑक्टोबर २०२१ रोजी एनसीबीने (NCB) छापा टाकला आणि या छापेमारीमध्ये क्रुझवर ड्रग्स पार्टी सुरु असल्याचे निदर्शनास आले. या पार्टीत बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सहभागी असल्यामुळे त्याला एनसीबीने ताब्यात घेतलं. दरम्यान आतापर्यंत एनसीबीने आर्यनसह अन्य ९ जणांवर अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातील कलमांपैकी २०(बी) या कलमात १० वर्षे कारावास आणि एक लाख रुपयांच्या दंडाची तरतूद आहे. सध्या केला कोर्टात या प्रकरणावर सुनावणी सुरु आहे. गेल्या २ १/२ तासांपासून हि सुनावणी सुरु असल्यामुळे सर्वांची धाकधूक वाढली आहे. यावेळी आर्यन खान, अरबाज मर्चेंट, मुनमुन धमेचा यांना न्यायालयात हजर केलं आहे. आता प्रश्न असा कि काय होणार आर्यनचं? सुटणार का लटकणार? कारण निश्चितच आर्यनवरील गुन्हा सिद्ध झाला तर त्याला १० वर्षांचा कारावास होऊ शकतो.

Mumbai | All accused arrested yesterday following NCB raid on a cruise ship off Mumbai coast brought to a city court pic.twitter.com/LgW93ZdyuN

— ANI (@ANI) October 4, 2021

एनसीबीने केलेल्या कारवाईमध्ये आर्यनसह अन्य ९ जणांना ताब्यात घेण्यात आलं होत. या सगळ्यांवर अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गंत कलम २० बी, ८(सी)२७ आणि ३५ सह अन्य कलम लावण्यात आले आहेत. तसेच २०(बी) कलमांतर्गंत जो कोणी या कायद्याचे उल्लंघन करतो त्याला शिक्षा होते. अर्थात मादक पदार्थांची आंतरराज्यीय आयात- निर्यात केल्यास संबंधिताला १० वर्षांची शिक्षा आणि १ लाख रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो. आर्यनवर एनडीपीएसच्या कलम २७ अंतर्गंत गुन्हा दाखल केलेला आहे. त्यामुळे त्याला २० हजार रुपये दंड आणि १ वर्षांचा तुरुंगवास होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं एनसीबीच्या अधिकाऱ्याने सांगितलं आहे. कारण आर्यनकडे कोणतेही अमली पदार्थ सापडले नाहीत. मात्र, आर्यनचा मित्र अरबाज मर्चंट याच्या बुटांमध्ये चरस लपवल्याचे समोर आले.

For all those targetting #Bollywood remember all the #NCB raids on filmstars? Yes nothing was found and nothing was proved. #Bollywood gawking is a tamasha. Its the price of fame

— Suchitra Krishnamoorthi (@suchitrak) October 3, 2021

भारतीय राज्यघटनेमध्ये कलम ४७ अन्वये राज्याला ड्रग्स नियंत्रणासाठी अधिकार दिलेले आहेत. यामुळे ड्रग्स नियंत्रणांतर्गत ३ श्रेणींमध्ये ड्रग्सची चर्चा सध्याच्या कायद्यामध्ये आहे. १ – एलएसडी, मॅथसारखे सायकोट्रॉपिक पदार्थ, २- चरस, गांजा, अफीमसारखे नारकोटिक्स पदार्थ, ३- मादक पदार्थांचे केमिकल मिश्रित पदार्थ, ज्यांना कंट्रोल सब्सटेंट म्हणतात. या प्रकरणामध्ये आरोप सिद्ध झाल्यास किमान १० वर्षांची शिक्षा होऊ शकते. तसेच १ लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. अद्याप कोणताही निकाल लागलेला नसल्यामुळे सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. तर बॉलिवूडकरांनी मात्र शाहरुख आणि आर्यन यांना पुरेपूर पाठिंबा दिला आहे.

Tags: Aryan KhanKila CourtMumbai Cruise Drugs CaseNCBShahrukh Khan
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group