हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग याने एका मॅगझिनसाठी अतिशय धक्का देणारं फोटोशूट केलं आहे. याबद्दल सोशल मीडियावर खतरनाक चर्चा सुरु आहेत. रणवीरचं हे फोटोशूट न्यूड फोटोशूट असल्यामुळे अनेकांना यावर काय बोलावं तेदेखील समजेना झालं होत. यानंतर सामाजिक संघटना तसेच समाज कार्यकर्ते अखेरीस रणवीरच्या निषेधार्थ सक्रिय झाले. ज्यामुळे राज्यात विविध ठिकाणी त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी मागणी केली गेली. दरम्यान चेंबूरमध्ये पोलीस तक्रार दाखलही झाली. यानंतर आता मुंबई पोलीस सायबर पोलिसांच्या मदतीने केसचा तपस करू लागले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता रणवीर सिंगला मुंबई पोलीस समन्स बजावण्याच्या तयारीत आहेत. न्यूड फोटोशूट प्रकरणी याबाबत तांत्रिक तपास सुरू करण्यात आला आहे. मुंबई पोलीस सायबर पोलिसांची मदत घेत असून या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. हे फोटोशूट कुठे शूट करण्यात आलं..? यासाठी कोणती खाती वापरण्यात आली..? यासारख्या माहितीसाठी चेंबूर पोलीस सायबर पोलिसांची मदत घेत आहेत. याच पोलीस ठाण्यात अभिनेता रणवीर सिंगवर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे.
Complaint registered against actor Ranveer Singh in Mumbai's Chembur Police Station for posting nude pictures on his Instagram account. Police have yet to register an FIR.
(file photo) pic.twitter.com/B0G38hvave
— ANI (@ANI) July 25, 2022
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह फोटो शेअर करणे हि बाब दुर्लक्ष करण्यासारखी नाही. शिवाय हा एक गुन्हा असल्याची नोंद आहे आणि त्यामुळे चित्रपट अभिनेता रणवीर सिंगवर मुंबईतील चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रणवीर सिंगविरोधात पोलिसात तक्रार दाखल केलेल्या समाज कार्यकर्त्याने सांगितले कि यामुळे तरुण पिढीला चुकीचे मार्गदर्शन मिळेल आणि हे फोटो महिलांना लज्जा वाटेल असे आहेत. या गोष्टीची दखल घेत पोलिसांनी गुन्हा विविध कलमांतर्गत दाखल केला आहे. आयपीसी कलम 292, 293, 509, ते कलम 67(ए) अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे हे प्रकरण रणवीरला चांगलाच भोवलंय असं म्हणता येईल.
Discussion about this post