Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

भाईजानच्या सुरक्षेत आणखी वाढ; मुंबई पोलिसांकडून ‘Y+’ सुरक्षा प्रदान

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 1, 2022
in Trending, Hot News, फोटो गॅलरी, बातम्या, महाराष्ट्र, सेलेब्रिटी
Salman Khan
0
SHARES
798
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड इंडस्ट्रीचा लाडका भाईजान अर्थात अभिनेता सलमान खान याला गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. यामुळे आता त्याच्या सुरक्षेबाबत यंत्रणांनी आणखी एक ठोस पाऊल उचलले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खान याला मुंबई पोलिसांकडून ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. हा निर्णय पोलीस प्रशासनाकडून घेण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. यासंबंधित माहिती ANI वृत्त संस्थेमार्फत दिली गेली आहे.

Maharashtra | Mumbai police to provide Y+ security cover to actor Salman Khan. The step has been taken by the state govt after the actor received a threat letter from Lawrence Bishnoi gang earlier: Maharashtra Police

(File Pic) pic.twitter.com/0CjJuE3Zqm

— ANI (@ANI) November 1, 2022

ANI वृत्त संस्थेने अधिकृत ट्विटर हँडलवर या संबंधित माहिती दिली आहे. ज्यामध्ये सांगण्यात आले आहे कि, बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला यापुढील काळात मुंबई पोलिसांकडून ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा देण्यात येणार आहे. प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धु मुसेवाला हत्याकांडातील मुख्य आरोपी लॉरेन्स बिष्णोई गॅंगकडून सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. याची सुरुवात एका निनावी पत्राने झाली होती. अभिनेता सलमान खानचे वडील सलीम खान यांना मॉर्निंग वॉकसाठी गेले असताना एका बेंचवर हे धमकीचे पत्र मिळाले होते. ज्यामध्ये सलमान आणि त्याचे पिता सलीम यांना जीवे मारण्याची धमकी दिली गेली होती.

View this post on Instagram

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

सलमानने या प्रकरणाची मुंबई पोलिसांना पूर्ण माहिती दिली होती. ज्यानंतर यंत्रणा सक्रिय झाली आणि त्यांनी सलमान तसेच त्याच्या कुटुंबाची सुरक्षा वाढवली. या प्रकरणामूळे बॉलीवूडमध्येही मोठी खळबळ उडाली होती. इतकेच नव्हे तर या प्रकरणामुळे सलमान खान याला खाजगी शस्त्र बाळगण्याचा परवाना देखील देण्यात आला. शिवाय सलमानने बुलेट प्रूफ गाडी देखील खरेदी केली आहे. सलमानच्या सुरक्षेची पूर्ण जबाबदारी पोलीस प्रशासनावर असल्यामुळे येत्या काळात त्याला ‘वाय प्लस’ सुरक्षा देण्याचा मोठा निर्णय शासनाने घेतल्याचे बोलले जात आहे.

Tags: ANIbollywood actorDeath Threatsmumbai policeSalman Khan
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group