हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बॉलिवूडच्या ‘ड्रग्ज कनेक्शन’ प्रकरणी विवेक ओबेरॉयचीही चौकशी करण्यासाठी आम्ही एनसीबीला निवेदन देणार आहोत. एनसीबीने अभिनेता विवेक ओबेरॉय याची चौकशी केली नाही तर मुंबई पोलीस त्याची चौकशी करतील, असा इशारा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला.
प्रसारमाध्यमांशी बोलताना अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली. विवेक ओबेरॉय हे भाजपचे स्टारप्रचारक आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील 27 भाषेतील बायोपिकमध्ये काम केलं आहे. विवेक ओबेरॉय यांच्या ड्रग्ज कनेक्शनची चौकशी करण्याची मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत आणि इतर काँग्रेस नेत्यांनी केली आहे. विवेक ओबेरॉयची चौकशी करण्यासाठी बंगळुरू पोलीस मुंबईत आले आहेत. मात्र, एनसीबीने अद्यापही या प्रकरणाची चौकशी केलेली नाही. त्यामुळे आम्ही एनसीबीला निवेदन देणार असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्याची विनंती करणार आहोत. एनसीबीने या प्रकरणाची चौकशी केली नाही तर मुंबई पोलीस विवेक ओबेरॉयची चौकशी करेल, असं देशमुख यांनी स्पष्ट केलं.
केवळ आदित्य याचा शोध घेण्यासाठी विवेकाच्या घराची झडती न घेता ‘ड्रग्ज रॅकेट’मध्ये त्याचा प्रत्यक्ष संबंध आहे का, याचा तपास ‘एनसीबी’ने करावा. जर ‘एनसीबी’ने असा तपास केला नाही तर आपण मुंबई पोलिसांकडून हा तपास करून घेऊ, असे देशमुख यांनी सांगितले. काँग्रेसच्या प्रतिनिधी मंडळाने देशमुख यांची भेट घेऊन विवेकच्या चौकशीची मागणी केली. त्यावेळी देशमुख यांनी हे आश्वासन दिले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’