हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी चित्रपट सृष्टीत स्वतःच्या कलेच्या जोरावर ज्यांनी आपले नाव मोठे केले अश्या कोटण्याही व्यक्तिमत्वाला आणि कलाकाराला हि इंडस्ट्री कधीच विसरत नाही. मुख्य म्हणजे या कलाकारांच्या कलेला रसिक प्रेक्षक नेहमीच स्मरणात ठेवतात आणि त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद देताना दिसतात. असेच एक गाजलेले नाव म्हणजे नागराज मंजुळे. होय. नागराज पोपटराव मंजुळे हे एक असे नाव आहे जे मराठी चित्रपटसृष्टीत अत्यंत आदराने घेतले जाते. सैराटच्या प्रचंड यशानंतर दिग्दर्शक आणि लेखक नागराज मंजुळे यांची कीर्ती अगदी सातासमुद्रापार गेली.
मराठी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाची प्रेक्षकांना नेहमीच उत्सुकता असते. पण गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे प्रेक्षकांचा यांच्याशी संपर्क तुटला होता. पण आता हा धोका ओसरू लागल्यामुळे राज्यातील चित्रपटगृहे हळूहळू पूर्वपथावर येत सुरु होत आहेत. यामुळे फँड्री, सैराट आणि नाळ या चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या काळजाला हात घालणारे नागराज मंजुळे आता एक नवीकोरी कथा आणि नवाकोरा सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या चित्रपटाचे नाव ‘घर बंदुक बिरयाणी’ असे आहे. या चित्रपटाचे संगीत ए. प्रफुलचंद्र यांनी दिले असून निर्मिती सूत्र नागराज मंजुळे यांच्यासह त्यांचा भाऊ भूषण पोपटराव मंजुळे यांच्या हाती होती. शिवाय संवाद आणि पटकथा मंजुळेंसह लेखक हेमंत अवताडे यांनी लिहिलेले आहेत. हा चित्रपट २०२२ साली धुमाकूळ घालणार इतके नक्की.
घर बंदूक बिरयानी या चित्रपटाचा टीझरदेखील नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे. हा टिझर पाहिल्यानंतर तर चाहत्यांमध्येसुद्धा एक वेगळीच उत्सुकता निर्माण झाली आहे कि, हा चित्रपट नक्की काय आहे. यात काय असेल? दरम्यान या टीजरमधून सयाजी शिंदे, नागराज मंजुळे आणि आकाश ठोसर हे कलाकार असल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान, नागराज मंजुळे आणि झी स्टुडिओजने या चित्रपटाची निर्मिती केली असल्याने सर्वत्र या चित्रपटाची चर्चा आहे. पण या शीर्षकाने मात्र अनेकांचे लक्ष वेधून घेण्यात यश मिळवले आहे. आता प्रतीक्षा आहे ती चित्रपटाच्या रिलीज डेटची.
Discussion about this post