Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

कसं एव्हढं येडं बनवतात राव..?; ‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेवर प्रेक्षकांची सडकून टीका

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 15, 2022
in बातम्या, व्हिडिओ
0
SHARES
68.9k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या झी मराठी वाहिनीवर नवनवीन मालिकांचं सत्र सुरु झालं आहे. या मालिकांना येऊन अगदी काहीच दिवस झाले तोवर या मालिका टीआरपीच्या रेसमध्ये उतरल्या आहेत. ‘नवा गडी नवं राज्य’ या मालिकेने तर अगदी काही काळातच प्रेक्षकांवर जादू केल्याचे पहायला मिळाले. मालिकेचे कथानक आणि मालिकेतील कलाकार सगळेच प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहेत. असे असताना हि मालिका नुकत्याच रिलीज केलेल्या एका प्रोमोमुळे ट्रोल होऊ लागली आहे. प्रेक्षकांनी मालिकेच्या कथानकावर आणि लेखकावर सडकून टीका केल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

त्याच काय झालं, अलीकडील काही भागात कल्पनेच्या पलीकडील घटना या मालिकेत दाखवल्या गेल्या. जसे कि, या मालिकेत अभिनेत्री अनिता दाते रमाची भूमिका साकारत आहे आणि रमाचे काही वर्षांपूर्वीच निधन झाल्याचे दाखवले आहे. पण ती तिच्या नवऱ्याच्या म्हणजेच राघवच्या आयुष्यातून काही जात नाही असे दाखवले आहे. दरम्यान ती नवऱ्याच्या दुसऱ्या बायकोला म्हणजेच पल्लवी पाटील साकारत असलेली भूमिका आनंदीला दिसू लागते. मग ती कधी आनंदीची फजिती करते, तर कधी तिच्या मागे पुढे करते.

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

काही दिवसांपूर्वी झालेल्या गणपती विशेष भागात रमा भूत असूनसुद्धा बाप्पाचे दर्शन घेताना आणि त्याच घरात वावरताना दिसली. इतकंच काय तर आनंदीने रमाचा म्हणजेच भुताचा ओवसासुद्धा भरला. यानंतर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोत दाखवले आहे की, रामरक्षा स्त्रोत्र म्हटल्यानंतर रमा घाबरते आणि पळून जाते. नेमका हाच मुद्दा प्रेक्षकांना खटकलं आणि मालिका ट्रोल झाली.

एका नेटकऱ्याने म्हटले कि, ‘भूत सुवासिनीचा ओवसा घेतं, गणपतीच्या दर्शनालाही येतं आणि मग रामरक्षा म्हटल्यावर का भीतं काय माहित’. तसेच आणखी एकाने लिहिले कि, ‘गणपतीच्या पाया पडली तेव्हा काही झालं नाही, पुजेला बसली तेव्हाही नाही झालं आणि मंत्र बोल्ल्यावर झालं? कसं एवढं येडं बनवतात राव?’. तसेच आणखी एकाने वाहिनीवर निशाणा साधत म्हटलंय कि, झी मराठी बकवास झालाय.’ सध्या हा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून चांगलाच ट्रोल होतो आहे.

Tags: Instagram PostNava Gadi Nav RajyaPromo VideoSocial Media TrollingViral VideoZee Marathi Serial
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group