Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

आनंदीच्या संसारात सवतीची एंट्री; ‘नवा गडी नवं राज्य’ मालिका रंजक वळणावर

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 26, 2022
in Trending, TV Show, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Nava Gadi Nava Rajya
0
SHARES
198
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठीवरील अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी मालिका ‘नवा गडी नवं राज्य’ मध्यंतरी ट्रोलर्सच्या निशाण्यावर आल्याचे दिसली. इतकेच काय तर काही बाबतीत प्रेक्षक वर्गानेही आपली नाराजी दर्शवली. पण आता या मालिकेची गाडी पुन्हा एकदा रुळावर येऊ लागली आहे. अखेर मालिकेतील बहुप्रतीक्षित क्षण आलाच.

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

दोन्ही सवती एकमेकांसमोर आल्या आहेत. आता पुढे काय..? याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे. पण तूर्तास तरी रविवारी झालेल्या १ तासाच्या विशेष भागामुळे मालिकेचा प्रेक्षक वर्ग पुन्हा एकदा मालिकेकडे वळला हे तेव्हढं खरं.

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

सध्या पितृपक्ष सुरु असल्यामुळे मालिकेतही या दिवसांचा पुरेपूर वापर केला गेला. मालिकेत देवाज्ञा झालेली रमा पित्री पक्षाच्या निमित्ताने पुन्हा एकदा घरात आली आहे. कशाला..? तर सवतीच्या डोक्यावर मिऱ्या वाटून तिची पुन्हा माहेरी पाठवणी करायला.

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

आता कुठे रमाचा संसार सांभाळायला आलेल्या आनंदीला स्वतःची अशी जागा मिळू लागली होती. नवरा राघव तिची काळजी करू लागला होता आणि लेक चिंगी म्हजेच रेवा तिच्या जवळ जाऊ लागली होती. तोच तिच्या संसारात सवतीने पुन्हा एंट्री केल्यामुळे आता सगळं मुसळ केरात जाणार.

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

लग्नाच्या दिवशी आनंदीने घरात पाय टाकताच रमाचा त्रागा होऊन तिची फोटोफ्रेम फुटते आणि आनंदी आपल्या सवतीला पाहू शकत नाही. पण रमा शेजारी होऊन आनंदीशी गट्टी जुळवते.

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

कधी गोड तर कधी मिठाचा खडा टाकून ती आनंदीला त्रास देते. यानंतर अलीकडच्या काही भागांमध्ये आनंदीला रमा म्हणजे तिला वाटणारी कोलते वहिनी नसून कुणी वेगळीच बाई आहे हे समजते आणि ती रमासोबतची मैत्री तोडून टाकते. यानंतर राघव रमाचं खराब पोर्ट्रेट पाहून चिडतो, नाराज होतो.

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

त्याला खुश करण्यासाठी चिंगी आणि आनंदी रमाचं चित्र रेखाटतात. रमाच्या आवडीचे सगळे पदार्थ वाडीवर ठेवून आनंदी रामाच्या जवळ जाऊ पाहते. पण सोडेल ती रमा कुठली. ती वाडी घेतच नाही आणि राघव नाराज होतो. मात्र आईने शेंगदाण्याची चटणी ठेवताच रामा वाडी शिवते.

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

यानंतर रमाचं पोट्रेट घरात घेऊन राघव खुश होतो आणि रमा आली म्हणतो. आनंदीचं चित्रदेखील पूर्ण झालेलं असतं तोच चिंगी तिला ओढत बाहेर नेते आणि रमाचा फोटो पाहून आनंदी भांबरते आणि घाबरून जाते. यानंतर आता खरी मालिकेला सुरुवात झाली असून मूळ मुद्द्याला हात घातला गेला आहे. त्यामुळे हि मालिका आता आणखीच टीआरपी ओढणार यात काही सवालच नाही.

Tags: Instagram PostNava Gadi Nav RajyaTV Showzee marathiZee Marathi Serial
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group