हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडमधील अष्टपैलू अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी नेहमीच विविध आव्हानात्मक भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करीत असतो. त्यामुळे त्याचा असा वेगळा चाहता वर्ग आहे. विविध पुरस्कारांनी नेहमीच नवाजुद्दीन यांच्या कलेचा गौरव केला आहे. यानंतर आता आणखी एक वेगळी, विशेष आणि अतिशय लक्षवेधी भूमिका घेऊन नवाजुद्दीन येत आहे. नुकताच त्यांच्या ‘हड्डी’ या चित्रपटाची निर्मात्यांनी घोषणा केली आहे.सोबतच या चित्रपटाचा फर्स्ट लुकदेखील रिलीज करण्यात आला आहे. अत्यंत थ्रिलिंग असं याचं मोशन पोस्टर आहे.
‘हड्डी’ या चित्रपटाचं शीर्षकंच इतकं वेगळं आहे कि आपोआपच प्रेक्षकांचा लक्ष याकडे जातोय. मुख्य म्हणजे चित्रपटाचे आकर्षण आहे ती नवाजुद्दीन सिद्दीकी यांची भूमिका. आतापर्यंत सगळ्या भूमिकांपेक्षा हि भूमिका प्रचंड वेगळी आहे. कारण पहिल्यांदाच अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी या चित्रपटाच्या माध्यमातून ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकतेच रिलीज झालेले सिनेमाचे मोशन पोस्टर पहिले तर यामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी आहे हे ओळखणे जवळपास अशक्य झाले आहे. अद्याप नवाजुद्दीन यांच्या या भूमिकेविषयी आणि चित्रपटाच्या कथानकाविषयी फारसे काही समोर आलेले नाही. पण मोशन पोस्टर पाहून हा चित्रपट हटके असणार असे वाटत आहे.
‘हड्डी’ या चित्रपटाचे मोशन पोस्टर तर दमदार आहेच. शिवाय मोशन पोस्टरमागे चालू असलेलं बॅक ग्राउंड म्युझिकदेखील कमालीचे थ्रिलिंग आहे. या पोस्टरमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी पूर्ण ट्रान्सजेंडर लूकमध्ये दिसत आहेत. त्यांचा मेकअप आणि चेहऱ्यावरील हावभाव फारच वेगळं कथानक असल्याचे दर्शवित आहे. यामध्ये त्यांचे हात रक्ताने माखलेले असून हातात रक्ताने बरबटलेले धारदार शस्त्र देखील दिसत आहे. मोशन पोस्टर झी स्टुडिओच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर हे मोशन पोस्टर रिलीज झाले आहे. याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. अक्षत अजय शर्मा दिग्दर्शित हा चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे अशी माहिती निर्मात्यांनी दिली आहे.
Discussion about this post