Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

हॉलिवूडच्या ‘ब्लॅक पँथर’मध्ये नीरज चोप्राची दमदार एंट्री; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 29, 2022
in Trending, Hot News, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
89
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मार्वलचा ‘ब्लॅक पँथर – वाकांडा फॉरएव्हर’ हा हॉलीवुड चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार अशी माहिती मिळत आहे. हा चित्रपट भारतामध्ये विविध ४ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. सध्या या चित्रपटाचे प्रमोशन सुरु असून याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. मार्वलने या चित्रपटाचा एक प्रोमो शेअर केला आहे. ज्यामध्ये आपल्या भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा दिसतोय. या प्रोमोमध्ये नीरज त्याचे भालाफेक कौशल्य दाखवताना दिसतोय. या चित्रपटातील निरजची एंट्री सगळ्यांना भावली आहे.

View this post on Instagram

A post shared by Marvel India (@marvel_india)

या चित्रपटाबद्दल नीरज चोप्रा म्हणाला कि, ‘चित्रपटाची कथा एका जबरदस्त योद्ध्याची आहे. ही कथा एका वीराबद्दल आहे जो आपल्या लोकांसाठी आणि देशासाठी लढण्यास तयार आहे. एक खेळाडू म्हणून, भारताचे प्रतिनिधित्व करणे, माझ्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. आणि जसा मी माझ्या खेळासाठी शेवट पर्यंत लढतो तसेच या चित्रपटामध्ये दाखविले आहे .त्याचा एक भाग बनून मला आनंद होत आहे. जसा ब्लॅक पँथर आपल्या स्वप्नाशी एकनिष्ठ आहे त्याचप्रमाणेच, लोकांनी त्यांची स्वप्ने सोडू नयेत. मी स्वतः मार्वलचा चाहता असल्याने मी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहे.’

View this post on Instagram

A post shared by Marvel India (@marvel_india)

रिपोर्टनुसार, ब्लॅक पँथर – वाकांडा फॉरएव्हर या चित्रपटाचे दिग्दर्शन रायन कूगलर यांनी केले आहे. तर केविन फीगे आणि नॅट मूर यांनी चित्रपटाची निर्मिती सूत्र सांभाळली आहेत. मुख्य म्हणजे हा चित्रपट इंग्रजी भाषेव्यतिरिक्त इतर तमिळ, तेलुगु आणि हिंदी भाषेतसुद्धा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. येत्या ११नोव्हेंबर २०२२ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. या चित्रपटात राणी रामोंडा, शुरी, म्बाकू, ओकोये, डोरा मिलाजे राजा, अँजेला बॅसेट, लेटिशिया राइट, विन्स्टन ड्यूक, डॅनाई गुरिरा आणि फ्लोरेन्स कसुंबा हि जबरदस्त पात्रे दिसणार आहेत.

Tags: Hollywood MovieInstagram PostNeeraj ChopraNew Upcoming MovieViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group