हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल हि बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा चर्चेत आल्याचे दिसून आले. तसे कारण जुनेच असले तरी वाद नवा होता. अलीकडेच ३ मिनिटांच्या परफॉर्मन्स साठी ४ लाख रुपये घेणाऱ्या अमिषावर कार्यक्रम आयोजकांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. त्यावर तिने आपल्या सुरक्षेचे कारण देत चांगली सारवा सारव केली होती. यामुळे अमिषा चांगलीच चर्चेत होती. यानंतर आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे आणि त्याचे कारण आहे नेल्सन मंडेला पीस अवॉर्ड्स २०२२. हा नोबेल पुरस्कार चक्क अमिषाला मिळालाय. होय. बॉलीवूडचे प्रसिद्ध खलनायक गुलशन ग्रोव्हर यांच्या हस्ते आमिषाने हा पुरस्कार स्विकारला आहे. पण यानंतर तिच्यावर कौतुक कमी आणि टीकाच जास्त झाल्याचे दिसून आले आहे.
मुंबईत नेल्सन मंडेला नोबेल पुरस्कार २०२२ हा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. या कार्यक्रमाला बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते गुलशन ग्रोव्हर, खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले उपस्थित होते. दरम्यान खासदार रामदास आठवले यांना नेल्सन मंडेला पीस अॅवॉर्ड २०२२ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल हिलासुद्धा यंदाचा नेल्सन मंडेला पीस अॅवॉर्ड मिळाला. यानंतर सोशल मीडियावर काहीसा हशा पिकल्याचे दिसून आले आहे. तसे अमिषाचे चाहते खूप खुश होऊन तिला अभिनंदनपर प्रतिक्रिया पाठवीत आहेत. तर अन्य नेटकरी मात्र अमिषाला ट्रोलिंगच्या सुया टोचण्यात व्यस्त आहेत. अमिषाला एवढ्या मोठ्या व्यक्तीच्या नावानं पुरस्कार म्हणजे आता आपण काय बोलायचे..?, तसेच आमिषाचा शांततेशी संबंध काय..?, पुरस्कार..? अरे पण कशासाठी..? अशा स्वरुपाच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर प्रकट होत आहेत.
याआधी अनेकदा अभिनेत्री अमिषा पटेल हि कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहिली आहे. जसे कि, कार्यक्रमासाठी उशिरा पोचणे, आयोजकांशी वाद घालणे आणि इतर. एकंदरच काय तर पीस अर्थात शांतता अवॉर्ड अमिषासाठी जाहीर होणे अनेकांच्या पचनी पडलेले नाही. ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटानंतर अमिषा फार काळ इंडस्ट्रीमध्ये जम धरू शकली नाही. पुढे तिने काही चित्रपटांमध्ये काम केले पण प्रेक्षकांना ती फारशी भावली नाही. परिणामी तिचा इंडस्ट्रीतला प्रवास जवळ जवळ थांबलाच. यानंतर ओटीटीवर तिने आपले नशीब आजमावले पण त्याचा काही फारसा उपयोग झाला नाही.
Discussion about this post