हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सिनेइंडस्ट्रीमध्ये गेल्या अनेक काळापासून विविध मुद्द्यांवर बोट ठेवून काही कलाकारांना डावलले जाते असे काहींचे ठाम मत आहे. यात अगदी वर्णद्वेष आणि घराणेशाही अशा मुद्द्यांचा समावेश आहे. या मुद्द्यांवर अनेकदा कंगना रणौतसारख्या स्पष्ट वक्त्या सेलिब्रिटींनी बोलणे आणि व्यक्त होणे पसंत केले आहे. तर अनेकांनी मात्र मौन बाळगणे सोयीचे समजले. यानंतर आता अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याने बॉलिवूड इंडस्ट्रीत सुरु असलेल्या वर्णभेदावर निशाणा साधला आहे. अलीकडेच एका मुलाखतीत नवाजुद्दीनने म्हटले कि, बॉलिवूडमध्ये नेपोटिझ्म तर आहेच, पण त्याचसोबत वर्णभेदही आहे. या दोन गोष्टी म्हणजे बॉलिवूडचं काळं सत्य आहे.
View this post on Instagram
पुढे नवाजुद्दीन म्हणाला कि, “मी सुद्धा एक अभिनेता आहे. सावळे लोक चांगला अभिनय करू शकत नाहीत का? मला एखादी अशी अभिनेत्री सांगा, जी सावळी असून सुपरस्टार आहे. मी माझ्यातील जिद्दमुळे स्टार झालो. माझ्यासारखी जिद्द अनेक अभिनेत्रींमध्ये आहे, पण आज मी ज्या स्थानी आहे, तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तुमच्यात अभिनयकौशल्यही त्या तोडीचं असावं लागतं”. “बॉलिवुडमध्ये वंशवाद आणि वर्णभेद गेल्या कितीतरी काळापासून आहे. म्हणून मी असा प्रश्न उपस्थित करतोय कि, एक अशी सावळी/काळी अभिनेत्री सांगा जी सुपरस्टार किंवा किमान स्टार तरी आहे.”
दरम्यान यावेळी नवाजुद्दीन सिद्दीकीला विवेक अग्निहोत्रींच्या ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाविषयी विचारण्यात आले असता यावर त्याने आपले मत प्रकट केले आहे. त्यावर तो म्हणाला, “मी अद्याप ‘द काश्मीर फाईल्स’ पाहिला नाही, पण मला वाटतं की मी तो पाहावा आणि नक्कीच पाहीन.” या चित्रपटाने बॉलिवूडमध्ये दोन गट पाडले आहेत का..? असा प्रश्न विचारण्यात आला असता नवाजुद्दीन म्हणाला कि, “मला हे माहीत नाही, पण प्रत्येक दिग्दर्शकाची चित्रपट बनवण्याची स्वतःची एक दृष्टी असते. त्यांनी त्यांच्या दृष्टिकोनातून चित्रपट बनवला. जेव्हा एखादा दिग्दर्शक असे चित्रपट बनवतो, तेव्हा साहजिकच त्याने तथ्य तपासलेले असतात.”
Discussion about this post