हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नेटफिक्सवर नुकतीच एक जबरदस्त भन्नाट वेबसीरिज रिलीज झाली आहे. जिचे नाव स्क्विड गेम आहे. ही मूळ दक्षिण कोरियन वेबसिरीज असून तिचे हिंदीत डब केले आहे. या सीरिजचे एकूण ९ एपिसोड आहेत आणि प्रत्येक एपिसोड तासाभराचा आहे. या सीरिजमधील मुख्य पात्र खूप कठीण काळातून जाताना दिसतात. त्यांच्यावर खूप मोठे कर्ज आहे. दरम्यान या सर्वांचे आयुष्य बदलण्यासाठी त्यांना एक गेम खेळायची संधी मिळते.
आता पैसे स्वतःहून आमंत्रण देत असतील तर कुणी कसे काय नाकारेल? पण अट एकच कि हा गेम जो कोणी जिंकेल त्याला जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याईतके पैसे मिळतील. पण जो हरेल तो मृत्यूला प्राप्त होईल. पण होते असे कि गरिबी दूर करण्यासाठी या सिरीजमधील काही मुख्य पात्र हा गेम खेळण्याचे आमंत्रण स्विकारतात.
या सीरिजमध्ये प्रत्येक सिन हटके आहे. ही सिरीज सर्व बाजूने परिपूर्ण आहे त्यामुळे पाहताना जी मजा येते ती सांगून कळणारी नाही. यात प्रत्येक कलाकाराने आपल्या भूमिकेला जीव ओतून न्याय दिला आहे. याचे चित्रीकरण खूप अनोख्या पद्धतीने अव्वलरित्या केले आहे. यातील प्रत्येक चांगले किंवा वाईट सिन इतके प्रभावी आहेत कि ते डोळ्यासमोरून हटत नाहीत. शिवाय प्रत्येक एपिसोडमध्ये प्रत्येक सीनमागील पार्श्वसंगीत अत्यंत लक्षवेधक आहेत हाच या सिरीजमधील सगळ्यात मोठा प्लस पॉइंट आहे.
शिवाय ही सीरिज खूप मोठी आहे. यात ९ एपिसोड आहेत. त्यात हि रंजक आणि सस्पेन्सशी संबंध ठेवत असल्यामुळे ही पूर्ण बघण्यासाठी खूप वेळ द्यावा लागेल. पण हि वेब सिरीज पाहण्यासाठी वीक माइंड नाही तर स्ट्रॉंग मेन्टॅलिटी हवी. याचे कारण असे कि, यात प्रचंड प्रमाणात हिंसा आहे. जी बघितल्यावर कदाचित तुम्हाला सहन न झाल्याने डोळे बंद करावे लागतील. पण जर तुम्ही थ्रिलर, सस्पेन्स, ट्विस्ट आणि ॲक्शन अश्या कॅटेगरीचे चाहते आहेत तर हि वेब सिरीज निश्चितच तुमच्याचसाठी बनलेली आहे.
Discussion about this post