हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नथुराम गोडसे यांनी गांधीजींवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली आणि त्यानंतर त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली, हे आपण जाणतोच. मात्र आजही हिंदुत्ववादी संघटनां गांधीजींचा तिरस्कार आणि नथुराम गोडसे यांचा जयजयकार करताना दिसतात. अनेकदा हिंदुत्ववादी विचारधारेचे मराठी अभिनेते शरद पोंक्षेदेखील नथुराम यांच्या बाजूने बोलताना दिसतात. काल १९ मे रोजी नथुराम गोडसे यांच्या जयंतीनिमित्त शरद पोंक्षे यांनी एक व्हिडिओ शेयर केला. ज्यामध्ये त्यांनी नथुरामचा कबुली जबाब का जाळला..? असा संतप्त सवाल केला आहे आणि त्यांची हि पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.
या व्हिडिओ अभिनेते शरद पोंक्षे म्हणत आहेत कि, ‘नथुराम गोडसेने जेव्हा पहिल्या दिवशी त्यांची जबानी दिली आणि जज तिथून निघून गेले त्यानंतर तिथे उपस्थित असलेले पत्रकार जेव्हा बाहेर आले तेव्हा त्यांच्यावर पोलिसांनी हल्ला केला, त्यांना घेराव घातला. त्यांच्या जवळ असलेले सगळे दस्तऐवज, नथुरामचा जबाब हिसकावून घेण्यात आला. एवढेच नाही तर त्यांना दमदाटी करून ते जबानीचे सगळे कागद जाळण्यात आले. शिवाय सर्व पत्रकारांना धमकावण्यात आले की, एक जरी शब्द नथुरामविषयी लिहाल तर तुमची काही खैर नाही. त्यानंतर नथुराम विषयी कधीही कोणत्या पेपरात छापुन आले नाही’.
शरद पोंक्षे यांच्या या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी विविध कमेंट केलेल्या आहेत. ज्या पाहिल्यावर समजत कि याविषयी वाहणारे दोन वेगवेगळे मतप्रवाह आहेत. एका नेटकऱ्याने तर शरद पोंक्षे याना शिवीगाळ करत म्हटले आहे कि, ‘हा *** स्वतःच्या पोरांना विदेशात पाठवून लोकांची माथी भडकण्याची काम करतोय. ज्या दिवशी याची पोरगी जय श्रीरामचे नारे देत रस्त्यावर उतरेल त्या दिवशी सगळे बहुजन रस्त्यावर उतरतील. चल होऊन जाऊदे’. तर आणखी एकाने म्हटले आहे कि, ‘*** काहीही टेपा लावतो!’. तसेच अन्य एकाने म्हटले कि, ‘स्वातंत्र्य लढ्यात कडीच योगदान नसणारा’.
Discussion about this post