Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘आर्चीला देऊन धोका, लक्ष्मीकडे गेला परश्या नावाचा बोका’; ‘त्या’ VIRAL फोटोवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 29, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, सेलेब्रिटी
Rinku_Akash_Sayalii
0
SHARES
396
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नागराज मंजुळेंच्या ‘सैराट’ चित्रपटातून परश्या आणि आर्ची हि दोन पात्रे प्रेक्षकांच्या भेटीस आली. दोघांनीही प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं. आर्ची हि भूमिका रिंकू राजगुरू तर परश्या हि भूमिका आकाश ठोसरने साकारली होती. आजही हि जोडी प्रेक्षकांना फार आवडते यात काही वादच नाही. अनेकदा त्यांना एकमेकांसोबत लग्न करण्याचा सल्लासुद्धा प्रेक्षक देतातात. अशातच काही तासांपूर्वी आकाश ठोसरने मुंडावळ्या बांधून नवरदेवाच्या लूकमधला फोटो शेअर केल्याने सगळ्यांची धडधड वाढली होती. यानंतर त्याने अभिनेत्री सायली पाटीलसोबतचा फोटो शेअर करत म्हटलं कि, आपणा सर्वांना आग्रहाचे निमंत्रण.. यायचं बर का…१० दिवस..’. यावर नेटकऱ्यांनी केलेल्या कमेंट्सने चांगलच लक्ष वेधून घेतल आहे.

View this post on Instagram

A post shared by Sayli Patil (@sayliipatil)

गेल्या दोन दिवसांपासून आकाशचा मुंडावळ्या बांधलेला फोटो पाहून तो लवकरच विवाहबंधनात अडकणार अशी चर्चा रंगली होती. इतकंच काय तर, यावर अभिनेत्री सायली पाटीलने ‘नवरी तय्यार आहे..’ अशी कमेंट केली होती. मग आकाशने सायलीच्या कमेंटचा स्क्रीनशॉट पोस्ट करत त्यावर ‘येतोय वरात घेऊन’ असे म्हटले आणि चाहत्यांमध्ये वेगळीच चर्चा सुरु झाली.

हि चर्चा काही स्वरूप घेण्याआधीच सोशल मीडियावर सायली वधू वेशात तर आकाश वर वेशात असलेला एक फोटो व्हायरल झाला. जो पाहून नेटकरी चक्रावले. एक मिनिट.. तुम्ही जो विचार करताय तसं हे नाहीये हे बरं. कारण या फोटोचा वास्तविकतेशी काहीच संबंध नाही. याचा संबंध ७ एप्रिल रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘घर, बंदूक, बिरयानी’ चित्रपटाशी आहे.

View this post on Instagram

A post shared by Akash Thosar (@akashthosar)

‘घर, बंदूक, बिरयानी’ या चित्रपटाचं प्रमोशन म्हणून हा फोटो शेअर करण्यात आल्याचे समजताच नेटकरी भारी जोमात आले. एकापेक्षा एक कमेंट करत नेटकऱ्यांनी लक्ष वेधून घेतलं आहे. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे कि, ‘ए परश्या आर्चीला धोका भाई…?’ तर आणखी एकाने लिहिलंय कि, ‘आता आर्चीला लक्षात आलं असेल, झक माराया तुझ्या मागे आली व्हती मी’. तसेच आणखी एकाने म्हटले आहे, ‘आर्चि नी टेंशन घेतलय भावा..फिनाईलच पिते आस बोलत होती मला…’. आणखी एकाने लिहलंय, ‘आर्चीचं काय होईल आता..?’. तर आणखी एकाने म्हटलंय, ‘आर्ची गेम झाला यार!!’

Tags: Akash ThosarGhar Banduk BiryaniInstagram PostSocial Media CommentsViral Photo
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group