हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड तसेच मराठी सिनेविश्वातील बहुचर्चित अन अत्यंत लोकप्रिय कपल जिनिलिया आणि रितेश देशमुख नेहमीच चर्चेत असतात. रितेश आणि जिनिलिया यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री आणि ऑफलाईन केमिस्ट्री कमालीची भारी आहे. हे दोघेही एकमेकांवरील प्रेम व्यक्त करतानाही कधीच मागे सरकत नाहीत. त्यामुळे हे कपल नेहमीच लक्ष वेधून घेत. यावेळी रितेश आणि जिनिलीयाच्या मुलांनी म्हणजेच छोट्याशा रियान आणि राहील यांनी लक्ष वेधून घेतलं आहे. रितेशने नुकतंच त्यांचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. जो पाहू नेटकरी त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
रितेशने नुकतंच त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट शेअर केली आहे. रितेशच्या दोन्हीही मुलांनी रविवारी एक फुटबॉलची स्पर्धा जिंकली आणि त्यावेळी दोघांना प्रमाणपत्र अन मेडल देऊन गौरविण्यात आले. यानंतर त्यांनी घरी येताच हे मेडल आजीच्या गळ्यात घातले आणि तिला मोठी मारली. यावेळी आजीने नातवंडांना अभिनंदन करत त्यांचे कौतुक केले आहे. सोबतच मुलांनी आजीला मदर्स डे च्या शुभेच्छा दिल्या आहेत. या भावनिक क्षणाचा व्हिडीओ रितेशने शेअर केला आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर करताना रितेशने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘रियान आणि राहिल या दोघांनीही फुटबॉल स्पर्धेत जिंकलेले मेडल्स मदर्स डे निमित्ताने आजीला दिले आहेत. आयुष्यातील काही क्षण अनमोल असतात. तुमच्या पालकांबरोबर वेळ घालवा. मुलांबरोबर वेळ घालवा’. रितेशच्या या व्हिडीओवर अनेकांनी विविध कमेंट केल्या आहेत. एकाने म्हटले आहे कि, ‘याला संस्कार म्हणतात, बाळांनो खुप मोठ्ठे व्हा’. तर आणखी एकाने म्हटले आहे कि, ‘मोठ्यांचा मानं ठेवणं त्यांना आदर देणं हीचं तर महाराष्ट्राची आणि मराठवाड्याची संस्कृती आहे’.
Discussion about this post