हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या प्रचंड चर्चेत आहे. त्यात प्राजक्ता सोशल मीडियावर दिवसातील बराच वेळ व्यतीत करते. यामुळे चाहत्यांच्या संपर्कात येण्याची आणि त्यांच्याकडून कौतुक मिळवण्याची एकही संधी ती सोडत नाही. प्राजक्ताच साडी प्रेम तर सगळ्यांनाच माहित आहे. त्यामुळे विविध साडीतील विविध लूक शेअर करून ती चाहत्यांना घायाळ करत असते. या नादात काही नेटकरी प्राजक्ताच्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत. काहींनी तर सोशल मीडियावर थेट प्रेमाची कबुली दिली आहे.
सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असणारी प्राजक्ता कधी आपल्या चित्रीकरणाचे, तर कधी विदेश दौऱ्याचे, इतकेच काय तर वैयक्तिक अनुभवसुद्धा ती सोशल मिडीयावर शेअर करत असते. यामुळे तिच्या प्रत्येक पोस्टवर तिचे चाहते भरभरून प्रेमाचा वर्षाव करतात. नुकतेच प्राजक्ताने बेरी रंगाच्या वनपिसमधील काही फोटो सोशल मिडीयावर शेअर केले आहेत. यासोबत तिने एक कॅप्शनही लिहिले आहे. तिने लिहिलंय कि, ‘इतर कोणाच्याही सावलीमागे जाण्यापेक्षा अंधारात एकटच चालेललं बरं’. फोटो नेहमीसारखेच होते. पण यावेळी चाहत्यांच्या प्रेमाचा बांधच फुटला. हे फोटो पाहून नेटकऱ्यांनी थेट प्रेमाचा इजहार केलाय.
प्राजक्ताचे हे फोटो सोशल मिडीआयवर प्रचंड व्हायरल होत आहेत. सोशल मिडीयावर तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. त्यामुळे तिचे हे फोटोदेखील मोठ्या प्रमाणात सोशल मिडीया गाजवत आहेत. पण फोटोंपेक्षा जास्त यावरील कमेंट्स लक्ष वेधून घेत आहेत. प्राजक्ताच्या या पोस्टवर एका चाहत्याने लिहिलं आहे की, ‘मी तुझ्यावर प्रेम करतो. तुझे प्रतीक महिला सशक्तीकरण आणि मजबूत व्यक्तिमत्व आणि महाराष्ट्राची सामाजिक परंपरा ब्यूटी क्वीन. मी पण तुझ्यावर प्रेम करतो.’ या कमेंटवर प्रतिक्रिया देत आणखी एका नेटकऱ्याने लिहिले कि, ‘तू काय मी पण करतो प्रेम.. तीच्यासाठी काय पण करायला तयार आहे.’. याशिवाय आणखी एकाने तिच्या कॅप्शनला अनुसरून कमेंट करीत म्हटलंय कि, ‘हो माहितीये तू खूप खूप स्ट्रॉंग आहेस. पण तू एकटी नसणार कारण अंधारात नीट दिसाव म्ह्णून तुझ्या मागेच मी LED टॉर्च घेऊन चालत राहीलं.’
Discussion about this post