हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘होणार सून मी या घरची’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली जान्हवी आणि ‘अगंबाई सासूबाई’ मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात वसलेली शुभ्रा म्हणजेच अभिनेत्री तेजश्री प्रधान हि अत्यंत प्रसिद्ध अभिनेत्री आहे. मालिका विश्वात तगड्या भूमिका साकारून तिने चित्रपटसृष्टीसह नाट्यविश्वातही आपली कलाकारी दाखवली आहे. चेहऱ्यावरील सुंदर तेज आणि मनमोहक हास्यमुळे तेजश्रीचे अनेक चाहते आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर तिचे फॉलोवर्स खूप आहेत. नुकतीच तेजश्रीने एक पोस्ट शेअर करत आपल्या चाहत्यांना एक महत्वाचा सल्ला देऊ केला आहे. यासोबतचे कॅप्शन आणि फोटोतील तिच्या डोळ्यातले भाव नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.
अभिनेत्री तेजश्री प्रधान ही सध्या सोशल मीडियावर सतत सक्रीय असल्याचे दिसून येत आहे. आपले विविध फोटो, व्हिडीओ, जुन्या आठवणी, किस्से ती सोशल मीडियावर शेअर करताना दिसते आहे. यामुळे ती चाहत्यांच्या संपर्कात राहताना दिसतेय. नुकताच तेजश्रीने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर स्वत:चा एक गोड फोटो शेअर केला आहे. सोबत तिने दिलेलं कॅप्शन अत्यंत लक्षवेधी आहे. यात तिच्या चेहऱ्यावर सुंदर स्मितहास्य दिसत आहे. सोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय कि, ‘हॅलो, एखाद्यासारखं सुंदर होण्याचा प्रयत्न करु नका. त्यापेक्षा तुम्ही स्वत:सारखे सुंदर बना!! #सुखी जीवन’
तेजश्रीच्या या कॅप्शनमधून आपसूकच अत्यंत महत्वाचा आणि मोलाचा सल्ला चाहत्यांना दिला जात आहे. या पोस्टवर अनेक नेटकरी प्रतिक्रिया देत आहेत. एकाने यावर कमेंट करत लिहिलंय कि, ‘तुमच्या डोळ्यातील शांतता आणि अभिव्यक्तीची शुद्धता चित्रात तुमच्या सभोवतालच्या इतर सर्व गोष्टींवर सावली टाकत आहेत. हे कोणत्याही स्क्रिप्टद्वारे दिग्दर्शित केले जाऊ शकत नाही …. ते असच बाहेर येत’.
याशिवाय आणखी एकाने लिहिलंय कि, ‘मी संभ्रमात आहे…. काय अधिक खोल आहे!! डोळे – स्मितहास्य – विचार’. तसेच आणखी एकाने काव्य पंक्ती लिहिल्या आहेत. त्या अशा आहेत कि, ‘उगवता सूर्य, कोवळं ऊन, प्राचीचे रंग उधळले सुंदर, पाण्यातील तरंग, कारंजाचे तुषार, झुळझुळ झरा वाहतो सुंदर’.
Discussion about this post