Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘हे सामी सामी बंद कर नाहीतर अनफॉलो करेन’; रश्मिकाच्या गाण्याची जादू संपली

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 17, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Sami SAmi
0
SHARES
302
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बघता बघता नॅशनल क्रश झालेली दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना तिच्या ‘पुष्पा- द राईज’ चित्रपटातील श्रीवल्ली भूमिकेमुळे जास्तच चर्चेत आली. तिचा अल्लू अर्जूनसोबतचा हा चित्रपट प्रचंड गाजला. या चित्रपटातील तिचे ‘सामी सामी’ गाणे तर सुपर डुपर हिट झाले. या गाण्यातील रश्मिकाची डान्स हुक स्टेप तर प्रेक्षकांना प्रचंड भावली. त्यामुळे ती जिथे कुठे जाते तिला सामी सामी गाण्यावर हुक स्टेप करायला सांगितले जाते. पण यावेळी तिच्या सामी सामी हुकस्टेपचा आपल्याला कंटाळा आलाय असे अनेक नेटकरी म्हणाले.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

अभिनेत्री रश्मिकाने नुकतीच हैदराबादच्या एका इव्हेंटमध्ये हजेरी लावली होती. यावेळीही तिने ‘सामी सामी’ या गाण्याच्या हुक स्टेप केल्या. तिचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. एकीकडे ती या व्हिडिओत स्टेजवर थिरकताना दिसते आहे. तर दुसरीकडे तिच्यासोबत सगळेच नाचतांना दिसत आहेत. फक्त यात एक मुलगी वेगळी आहे. जिच्या चेहऱ्यावर कसलेच हावभाव नाहित. त्यामुळे तिला रश्मिकाच्या गाण्याचा कंटाळा आलाय असे प्रेक्षक म्हणत आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानतंर लोकांनी रश्मिकाला जोरदार ट्रोल करायला सुरूवात केली. तिच्या या व्हिडिओवर भरमसाट कमेंट केल्या आहेत.

काहींनी रश्मिकाचा हा व्हिडीओ पाहून ती ओव्हर अॅक्टिंग करतेय असं म्हंटलय. तर काहींनी, ‘बस कर आता कंटाळा आला’ असे म्हटले आहे. एकाने तर ‘बस्स, हिला हेच आणि एव्हढंच येतं’ असंही म्हटलंय. तर, दुसऱ्याने ‘अरे अजून किती दिवस हेच करणार आहेस. ?’ असे विचारले आहे.

आणखी एकाने म्हटले आहे कि, ‘तुला याशिवाय दुसरं काही येत नाही का..? बघावं तेव्हा सामी सामीच करत असते. बस्स झालं आता…’. इतकाच काय एकाने तर, ‘हे सामी सामी बस कर नाहीतर अनफॉलो करेन’ अशी धमकीच दिली आहे. या कमेंट पाहून असं वाटतंय कि रश्मिकाच्या सामी सामीची जादू आता संपली आहे. लोकांना आता नवीन काहीतरी हवं आहे.

Tags: Instagram Postrashmika mandanaSocial Media TrollingViral SongViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group