हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीची अप्सरा अशी जिची ख्याती ती म्हणजे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोनाली सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. अनेकदा ती विविध लूक, पेहरावातील फोटो आणि व्हिडीओ तसेच आगामी प्रोजेक्टची माहिती देणाऱ्या पोस्ट शेअर करत असते. ज्या पाहून टिकचे चाहते तिच्यावर प्रेमाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसतात. सोनालीचे सोशल मीडिया इंस्टाग्रामवर २ मिलियनच्या आसपास फॉलोवर्स आहेत. त्यामुळे सोनालीने एखादी पोस्ट शेअर केली आणि त्यावर कमेंट्सचा पाऊस पडला नाही तर नवलंच.
नुकतंच सोनालीने एक नवं कोरं एकदम फ्रेश फोटोशूट शेअर केलं आहे. ज्यामध्ये तिने गुलाबी आणि भगव्या रंगाचा लॉन्ग क्रॉप कट गाऊन परिधान केला आहे. सोबत मोकळे केस आणि ग्लॉसी मेकपसह तिने स्वतःचा लूक पूर्ण केला आहे. या लूकसाठी तिने हाय हिल पॉईंट ऑरेंज रंगाचे शूज परिधान केले आहेत. तिचा हा लूक अत्यंत आकर्षक आणि फ्रेश फील देतोय. त्यामुळे सोनालीने हे फोटो सोशल मीडियावर शेअर करताच व्हायरल झाले आहेत. या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी विविध कमेंट करत पुन्हा एकदा तिला अप्सरा म्हटले आहे.
सोनालीचं हे फोटोशूट तिने परिधान केलेल्या ड्रेसच्या रंगामुळे नेटकऱ्यांना आकर्षित करत आहे. पाहताक्षणी अतिशय उत्साही वाटेल असे हे रंग परिधान केलेल्या सोनालीच्या सौंदर्याचा रंग पुन्हा एकदा नेटकऱ्यांना लागलाच. एका नेटकऱ्याने या फोटोंवर कमेंट करताना लिहिले आहे कि, ‘एकदम वादळ आणलंस..’ तर आणखी एकाने सोनालीला ‘गुलाबो’ म्हटलंय. तसेच आणखी एकाने, ‘किती ते सुंदर… फारच गोड दिसतेयस.. एकदम अप्सरा’.
सोनाली कुलकर्णीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, लवकरच येत्या काळात तिचा ‘छत्रपती मोगलमर्दिनी ताराराणी’ हा मराठमोळा ऐतिहासिक सिनेमा येऊ घातला आहे. या चित्रपटाच्या टीझरने सोशल मीडियावर अगदी दणाणून टाकला होता.
Discussion about this post