हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतही ग्लॅमर आणि बोल्डनेसची काहीच कमी नाही. याचं श्रेय ज्या अभिनेत्रींना जातं त्यामध्ये अभिनेत्री तेजस्विनी पंडितच्या नावाचादेखील समावेश आहे. तेजस्विनी जितकी उत्तम अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहे तितकीच परखड आणि स्पष्ट बोलण्यासाठीदेखील तीला ओळखले जाते. याशिवाय बोल्डनेसच्या बाबतीत तेजस्विनी कुणालाच ऐकत नाही. तिच्या अदा भल्याभल्यांना गार करतात. नुकताच तिने सोशल मीडियावर स्विमिंग पुलमधील फोटो शेअर केला आहे. जो पाहून तिचे चाहते तिच्यावर फिदा झाले आहेत.
अभिनेत्री तेजस्विनी पंडित हि सोशल मीडियावर फार सक्रिय असते. त्यामुळे ती नेहमीच विविध फोटो तसेच व्हिडीओ शेअर करत आपल्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसते. तेजस्विनीचा ड्रेसिंग सेंस आणि अदा नेहमीच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात. नुकताच तिने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती मस्त स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करताना दिसते आहे. या फोटोसोबत तिने अगदी सायलेंट कॅप्शन दिले आहे. तिने लिहिलंय कि, ‘आपल्यातील शांततेचे रक्षण करा!!’
तेजस्विनीने शेअर केलेला हा फोटो तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. अनेकांनी या फोटोवर हार्ट ईमोजी, फायर ईमोजी शेअर केले आहेत. तर काहींनी अतरंगी कमेंट करत सर्वांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. एका नेटकऱ्याने कमेंट करत म्हटलंय कि, ‘बिकिनीतील फोटो कधी टाकणार?’. तर आणखी एकाने लिहिलं आहे कि, ‘मला आशा आहे की तुम्ही पाण्याच्या भीतीवर मात कराल आणि ते तुमच्यासाठी शांततेत सुटका होईल.. प्रयत्न करत रहा. एका वेळी फक्त एक पाऊल’. तर आणखी एकाने तिला विचारलं आहे, ‘मॅडम तुम्ही जेवणात लक्स साबण खाता का..?. तर आणखी एका नेटकऱ्याने लिहिलंय, ‘शांततेचं रक्षण… तूला स्विमिंग पूलमध्ये हे कसं शक्य आहे..? तू कमालीची हॉट दिसतेयस’. आणखी एकाने लिहिलं, ‘मॅडम तुम्हाला बघून आम्हाला संरक्षणाची गरज वाटू लागली आहे.
Discussion about this post