Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘ती कोळंबी मरूदे.. तू आधी परत ये’; मधुराणीच्या फोटोवर मालिकेच्या प्रेक्षकांनी केल्या भन्नाट कमेंट

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 3, 2023
in Trending, TV Show, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
0
SHARES
6.2k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘आई कुठे काय करते’ या छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय मालिकेतून अभिनेत्री मधुराणी प्रभुळकर घराघरात आणि प्रेक्षकांच्या मनामनांत पोहोचली आहे. या मालिकेच्या काही भागांपासून एकामागे एक वेगवेगळे ट्विस्ट येताना दिसत आहेत. दरम्यान मालिका सुरु असली तरी त्यामध्ये आईची अर्थात अरुंधती म्हणून मधुराणीच्या अनुपस्थितीची जाणीव होत आहे. त्यामुळे मालिकेच्या ट्विस्ट दरम्यान अरुंधतीचे नसणे प्रेक्षकांना खटकते आहे आणि म्हणूनच मधुराणीने शेअर केलेल्या एका फोटोवर प्रेक्षकांनी तिला परत ये असे म्हटले आहे.

View this post on Instagram

A post shared by Madhurani Gokhale Prabhulkar (@madhurani.prabhulkar)

गेल्या काही दिवसांमध्ये ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अनेक ट्विस्ट येत आहेत. देशमुखांच्या घरात नुसता गोंधळ चालू आहे. दरम्यान या मालिकेत प्रमुख आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हि काही दिवसांपूर्वी मालिकेतून ब्रेक घेऊन तिच्या लेकीसोबत ऑस्ट्रेलिया टूरवर आहे. येथे मधुराणी तिच्या एका कार्यक्रमासाठी गेली आहे. दरम्यान मधुराणी ऑस्ट्रेलियाला गेल्याने मालिकेच्या कथानकामध्येही बदल करून अरुंधती परदेशात गेल्याचं दाखवण्यात आलं. यानंतर देशमुखांवर जणू संकटांचा डोंगर कोसळला आहे. अशावेळी मधुराणीची कमतरता प्रेक्षकांना त्रास देते आहे. अशातच मधुराणीने ऑस्ट्रेलियामधून हॉटेलमधील एक प्रॉन्सची डिश खातानाचा फोटो शेअर केला आहे आणि यावर प्रेक्षकांनी एका पेक्षा एक कमेंट केल्या आहेत.

मधुराणी ऑस्ट्रेलिया ट्रीप कशी चालू आहे याचे अपडेट्स सोशल मीडियावर देत असते आणि या दरम्यान तिने एका हॉटेलमध्ये प्रॉन लाक्सा खातानाचा फोटो शेअर केला आहे. यावर कमेंट करत एका नेटकऱ्याने लिहिले आहे कि, ‘अरुंधती लवकर ये इकडे. समृद्धीमध्ये खूप गोंधळ सुरु आहे. तुझी इकडे खूप गरज आहे’. तर आणखी एकाने लिहिलंय, ‘ये बाई लवकर इकडे देशमुखांच्या घरात नुसता गोंधळ चालू आहे’. तर आणखी एका युजरने लिहिलंय, ‘कांचनताई म्हणत असतील, अगं अरुंधती लवकर ये. इकडे सगळ्यांना वेड लागलंय. मला आता हे सांभाळायला जमणार नाही. ठेव ती कोळंबी बाजूला आणि लवकर ये एकदाची’.

Tags: Aai Kuthe Kay KarteInstagram PostMadhurani Gokhale-PrabhulkarViral CommentsViral Photo
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group