हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। उर्फी जावेद हे नाव गेल्या काही काळापासून सेलिब्रिटींपेक्षाही जास्त चर्चेत आहे. त्यामुळे उर्फी कधी सेलिब्रिटी यादीत सामील झाली तेच कळलं नाही. सोशल मीडियावर नेहमीच चित्र विचित्र फॅशन करून लक्ष वेधून घेणारी उर्फी ट्रोलर्सचीसुद्धा फेव्हरेट आहे. असे असूनही उर्फीत काडीमात्र बदल झालेला नाही. ती आणि तिचे आऊटफिट्स अजूनही सोशल मीडियावर गाजतायत. आजकाल वारंवार उर्फी कपड्याविना फॅशन करण्याचा फंडा आजमावताना दिसते आहे. आधी तोडके मोडके का होईना कपडे होते पण आता त्यांची गरज काही तिला वाटत नाही आणि यामुळेच सोशल मीडिया युजर्सचा पारा जाम चढला आहे.
सोशल मीडियावर वारंवार ट्रोल होऊनही उर्फीने बोल्डनेसच्या सगळ्या हद्दी पार केल्या आहेत. यावेळी उर्फीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तर तिने केवळ एक अंतर्वस्त्र आणि बाकी मोगऱ्याची फुलं यांच्यासह आपला फॅशन सेन्स पाजळला आहे. यामध्ये तीने हाताचे आपली छाती झाकली आहे तर बाकीचे अंग तिने मोगऱ्याच्या गजऱ्याने झाकले आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांची पुरतीच सटकली आहे. एकतर इस्लाम धर्मियांचा अत्यंत पवित्र असा रमजान महिना सुरु आहे. त्यात उर्फी स्वतः मुसलमान असून या पवित्र महिन्यात असे कपडे परिधान करत आहे हे पाहून लोकांच्या भावना दुखावल्या आहेत.
उर्फीचा हा व्हिडीओ रमजानच्या दरम्यान व्हायरल होत असल्यामुळे इस्लाम धर्मियांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. एका नेटकऱ्याने उर्फीच्या या व्हिडिओवर कमेंट करत लिहिले आहे कि, ‘हिला बोलून काहीही फायदा नाही.. हिला शिव्या देताना आपलं तोंड खराब होतं. त्यामुळे रमजानच्या दिवसांची काळजी घ्या आणि हिच्याकडे दुर्लक्ष करा.’ तर अन्य एकाने लिहिले आहे कि, ‘अरे, रमजान चालू आहे, हिला वर बसलेल्याची काहीच पर्वा नाही. आणखी एकाने तर म्हटले आहे कि, ‘जर त्या दिवशी तुझ्या आई वडिलांनी काँडम वापरलं असत तर आज हे दिवस बघायला लागले नसते’. तसेच अन्य एका युजरने विचारले आहे, ‘ या पोस्टवरचं डिसलाईक बटण कुठे गेलं रे..?’ तर आणखी एकाने म्हटले, ‘तुला पाहून आम्हाला लाज वाटतेय पण तू आहे तशीच’. तर आणखी एकाने म्हटलंय, ‘हि तर मुजरा पण करायला लागली.. थोड्या दिवसांनी रस्त्यावर धंदा पण करायला सुरुवात करेल’.
Discussion about this post