हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांच्या सौंदर्याने कित्येक घायाळ होत असतात. कधी अदा, कधी लचक, कधी इशारे, कधी हास्य अशा विविध माध्यमातून या अभिनेत्री चाहत्यांच्या दिलावर राज करतात. अशीच एक सुंदर अभिनेत्री म्हणजे मालिका क्षेत्रातील ओळखीचा चेहरा श्वेता रंजन. सध्या सोशल मीडियावर श्वेता कहर करते आहे. तिचे निळ्याशार पैठणीतील मोरांसारखं तीच सौंदर्यही कमालीचं नेटकऱ्यांच्या मनावर प्रभाव टाकत आहे.
अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्राम हँडलच्या माध्यमातून श्वेता रंजनने काही फोटो आणि व्हिडीओ पोस्ट शेअर केल्या आहेत. अभिनेत्रीने यामध्ये निळ्या आणि गुलाबी रंगाचा काठ असलेली जरतारी पैठणी नेसली आहे.
शिवाय यामध्ये तिने मोकळे केस सोडले आहेत. जे तिचं सौंदर्य आणखीच वाढवत आहे. श्वेताने कपाळावर साजेशी बिंदी, नाकात नथ, हातात बांगड्या, गळ्यात नेकलेस असा साज शृंगार केला आहे. यामुळे श्वेता प्रचंड घायाळ करणारी अदाकारा वाटते आहे.
तिच्या मोहक आणि दिलखेचक अदा दाखवत तिने ‘बाई गं’ या गाण्यावर एक व्हिडीओ तयार करून शेअर केला आहे. जो सध्या व्हायरल होतोय.
सुंदर दिसावं पण एव्हढं..? अशी उत्कट भावना निर्माण करणारं श्वेताचं सौंदर्य कमालीचं आहे. श्वेताच्या या फोटो आणि व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. नेटकरीच नव्हे तर काही कलाकार देखील श्वेताच्या सौंदर्यात विरघळले आहेत.
एका नेटकऱ्याने लिहिले आहे कि, देखणी दिसतेस.. तर आणखी एकाने लिहिले आहे कि, ते डोळे दे ना मला घायाळ ग!!! याशिवाय आणखी एकाने लिहिलंय कि, एका लावणीच्या ओळी आठवल्या.. पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा… आई मला नेसव शालू नवा. तर आणखी एका नेटकऱ्याने लिहिलंय कि, पैठणी इतकं सुंदर काही नाही.. पण तुझ्या इतकं सुंदर नाही च नाही.
Discussion about this post