हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | अभिनेता अक्षयकुमारचा बहुप्रतिक्षित सिनेमा लक्ष्मी बॉम्ब (lakshmi bomb) चा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला होता. यावर फॅन्सकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. आता हा सिनेमा पुन्हा एक सोशल मीडियावर वादात सापडला आहे. सोशल मीडियावरील काही लोकांचा आरोप आहे की, या सिनेमातून लव जिहादला प्रोत्साहन दिलं जात आहे.
‘लक्ष्मी बॉम्ब’ सिनेमात अक्षय कुमारच्या भूमिकेचं नाव आसिफ सांगितलं जात आहे. तर कियारा अडवाणीच्या भूमिकेचं नाव प्रिया आहे. तसेच दिवाळीआधीच रिलीज होत असलेल्या या सिनेमाच्या नावावरही काही लोकांनी आक्षेप घेतला आहे.
लक्ष्मी बॉम्ब’ हा तमिळ सिनेमा ‘कंचना’चा हिंदी रिमेक आहे. सोशल मीडियावरील लोकांचं म्हणणं आहे की, ओरिजीनल सिनेमात हिरोच्या भूमिकेचं नाव राघव होतं. तर या सिनेमात आसिफ कसं झालं आणि हिरोईनच्या भूमिकेचं नाव प्रिया का ठेवलं गेलं. त्यासोबतच लोकांनी या सिनेमाला बॉयकॉट करण्याची मागणी केली आहे.
एका यूजरने लिहिले आहे की, ‘हे बरोबर आहे का? ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाचे नाव काय असेल आणि दिवाळीनिमित्त प्रदर्शित होईल आणि या अभिनेत्याचे नाव असिफ आणि अभिनेत्रीचे नाव प्रिया ?? हे लोक लव्ह जिहादचे प्रमोशन का करत आहेत? आपण कोणत्या प्रकारच्या संस्कृतीचा प्रचार करीत आहात?
काही दिवसांपूर्वीच ज्वेलरी ब्रॅन्ड तनिष्कच्या एका जाहिरातीवरून वादळ उठलं होतं. ही जाहिरात लव्ह जिहादला प्रोत्साहन देणार असल्याचं बोलण्यात आलं होतं. कंगनानेही यावर ट्विट केलं होतं. वाद अधिक वाढल्याने कंपनीने जाहिरात परत घेतली होती.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’