हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| बॉलिवूड सिने इंडस्ट्रीतील लोकप्रिय कपल शेरशहा फेम अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांनी ७ फेब्रुवारी २०२३ रोजी एकमेकांसोबत लग्नगाठ बांधली. सिद्धार्थ-कियाराचा शाही विवाह सोहळा हा राजस्थानमध्ये जैसलमेर स्थित सूर्यगड पॅलेसवर दोघांचे कुटुंबीय, नातेवाईक आणि निकटवर्तीय मंडळी तसेच मित्र परिवाराच्या उपस्थितीत संपन्न झाला. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ तुफान व्हायरल झाले. यानंतर अलीकडेच रविवारी त्यांनी मोठया धूमधडाक्यात वेडिंग रिसेप्शन दिले. या सोहळ्याचे फोटो व्हिडिओ पाहून मात्र नेतकऱ्यांनी ट्रोल केले आहे.
गेल्या रविवारी, १२ फेब्रुवारी २०२३ रोजी बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांचे वेडिंग रिसेप्शन पार पडले. या सोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक नामांकित मंडळी उपस्थित होती. अनेक सेलिब्रिटींच्या हजेरीने या रिसेप्शन सोहळ्याला चार चांद लावले होते. यावेळी आपल्या वेडिंग रिसेप्शन सोहळ्यासाठी सिद्धार्थने शेरवानी तर कियाराने अतिशय सुंदर लाँग गाऊन परिधान केला होता. यावर तिने खड्यांची ज्वेलरी परिधान करत लूक पूर्ण केला होता. मात्र नववधु म्हणून हातात बांगड्या, गळ्यात मंगळसूत्र किंवा भांगेत कुंकू तिने परिधान न केल्यामुळे नेटकऱ्यांनी तिच्या लुकवर टीका केली आहे. शिवाय कियाराच्या गळ्यातील नेकलेसने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ही ज्वेलरी लग्नातलीच असल्याचा काहींनी दावा केलाय.
सिद्धार्थ – कियाराच्या रिसेप्शन फोटोंवर कमेंट करताना अनेकांनी कियाराच्या ड्रेस तसेच ज्वेलरीवर फोकस केला आहे. एकाने म्हटले आहे कि, ‘ड्रेस ठीक आहे. पण ज्वेलरी तर लग्नात घातलेली तीच वाटतेय’. याशिवाय आणखी एकाने कमेंट करताना म्हटले आहे कि, ‘वेडिंग रिसेप्शन आहे कि अवॉर्ड सेरेमनी’. तसेच अन्य एका नेटकऱ्याने कियाराने गळ्यात मंगळसूत्र का घातले नाही असा सवाल उठवला आहे. त्याने म्हटले आहे कि, ‘कुंकू आणि मंगळसूत्र का घातलेलं नाही…? तुम्हाला भारतीय पेहराव करता आला असता’.
Discussion about this post