हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवूडची ड्रामाक्वीन अभिनेत्री राखी सावंत ही वारंवार वैयक्तिक आयुष्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. आदिल खान दुर्रानीसोबत निकाह केल्यानंतर तिने इस्लाम धर्म स्वीकारला आणि स्वतःचे नाव बदलून फातिमा असे ठेवल्याचे तिने सांगितले होते. यानंतर अनेकदा राखी बुरख्यात दिसली. तसेच पवित्र रमजान महिन्यात तिने रोजाही ठेवला होता. मात्र चुकून चुईंग गम खाल्ल्यामुळे तिचा रोजा तुटल्याचे तिने सांगितले आणि यामुळे नेटकऱ्यांनी तिचा चांगलाच समाचार घेतला होता. अशातच आता राखी सावंत नमाज पठण करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये राखीकडून नमाज पठणावेळी झालेल्या चुकांमुळे ती ट्रोल होत आहे.
अभिनेत्री राखी सावंत हिने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये राखी नमाज पठण करताना दिसत आहे. यावेळी राखीने काळ्या रंगाच्या सूटवर हिजाब परिधान केलेला दिसत आहे. मात्र या कपड्यांमध्ये यावेळी तिचे घोटयापासून पाय उघडे दिसत आहेत आणि नखांची नेलपेंट जशीच्या तशी आहे. या गोष्टी नमाज पठण करताना महिलांसाठी अमान्य असल्यामुळे राखी सोशल मीडियावर ट्रोलिंगची शिकार झाली आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून नेटकरी तिला धर्माची चेष्टा करू नकोस असे वारंवार बजावताना दिसत आहेत.
राखीच्या या व्हिडीओवर एका नेटकऱ्याने लिहिलं आहे कि, ‘राखी, असे कपडे घातल्याने नमाज अल्लाह पर्यंत पोहचत नाही. तुझी सलवार पायाच्या घोट्यापर्यंत असायला हवी होती आणि नखांवर नेलपेंट सुद्धा नको होत. हि पद्धत चुकीची आहे.’ तर अन्य एकाने लिहिले आहे कि, ‘राखी, तू नमाज पठण करतेस हि चांगली गोष्ट आहे. मात्र नमाज पठण करताना पूर्ण कपडे परिधान कर. तुझी सलवार खूपच लहान आहे. अशा कपड्यात नमाज करत नाही’. तर आणखी एकाने म्हटले आहे कि, ‘ती नमाज पठण करत नाहीये. ती फक्त दिखावा करतेय. लोकांचं लक्ष वाढायला आणि प्रसिद्धी मिळवायला ती काहीही करू शकते’. तर अन्य एकाने म्हटले आहे कि, ‘इस्लाम धर्माची चेष्टा बंद कर.. हे रोज दिखाव्यासाठी नवीन कायतरी करताना नियमांचे उल्लंघन करून धर्माची खिल्ली उडवू नकोस’.
Discussion about this post