हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोशल मीडियासाठी उर्फी जावेद हे नाव काही नवीन नाही. आपल्या चित्र विचित्र फॅशनसाठी उर्फी नेहमीच चर्चेत असते. इतकंच काय तर विचित्र फॅशन साठी ती कित्येकदा नेटकऱ्यांकडून ट्रोल होते. पण तरीही बदलेल ती उर्फी कशी..? उर्फी नेहमीच विचित्र पेहरावाने सोशल मीडियावरील नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत असते. याहीवेळी तिने असाच काहीसा लूक करत सोशल मीडिया गाजवला आहे आणि नेहमीप्रमाणे याहीवेळी तिचा हा लूक पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
उर्फीचा हा लूक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. उर्फीचा या पेहरावातील अंदाज नेहमीप्रमाणेच बोल्ड आहे. तिने काय परिधान केले आहे याविषयी नेहमीप्रमाणे सोशल मीडियावर नेटकऱ्यांमध्ये चर्चा सुरु आहे. उर्फीला एक छोटंसं कापड देखील फॅशन म्हणून चालत हे काही वेगळं सांगायला नको. यावेळी उर्फीने कपडे म्हणून परिधान केलेल्या वस्तू अशाच काहीशा आहेत. उर्फीचा बिनधास्त अंदाज नेहमीच तिला नेहमीच सगळ्यांपासून वेगळं सिद्ध करतो. तिचा आत्मविश्वास चांगला आहे मात्र फॅशन… त्या बद्दल काय बोलणार. ती नेहमी काहीतरी विचित्र परिधान करून ट्रोलर्सला ट्रोलिंगचा विषय देत असते.
उर्फीच्या या फोटोंवर कमेंट करत एका नेटकऱ्याने लिहिले आहे कि, ‘या मुलीला काय आजार आहे काय माहित.. हिचे आईवडील हिला थांबवत का नाही?’ असेच आणखी एकाने लिहिले आहे कि, ‘असं वाटतंय कि, हिने भारतीय संस्कृती, भारतीय महिला यांना बिघडवण्याचा ठेका घेतला आहे..’. आणखी एका युजरने म्हटले आहे कि, ‘नेहमीप्रमाणे बेक्कार दिसतेय..’. अन्य एका युजरने म्हटले कि, ‘काय बाई आहे.. पैसे कमवायला आणि प्रसिद्धी मिळवायला स्वतःच शरीर दाखवते आहे’. आणखी एका नेटकऱ्याने असेही म्हटले आहे कि, ‘येत्या काळात हि स्वातंत्र्याच्या नावावर ना*डी फिरणार आहे’.
Discussion about this post