हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी बुधवारी आपल्या आगामी चित्रपटाच्या शुभारंभाची घोषणा केली. या चित्रपटाचे नाव ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ असे आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाची लवकरच सुरुवात केली जाणार आहे. तत्पूर्वी या चित्रपटातील मुख्य भूमिकांवरून पडदा उघडण्यात आला. ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार दिसणार असल्याचे समोर आले. यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अनेकांनी भूमिकेची निवड अयोग्य असल्याचे म्हटले आहे.
सध्या सोशल मीडियावर ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाची चर्चा जोरदार सुरु आहे. शिवाय शिवरायांच्या भूमिकेतील अक्षय कुमारचा लूक देखील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या दरम्यान अनेक नेटकरी शिवरायांच्या भूमिकेत अक्षय कुमार अयोग्य निवड असल्याचे बोलताना दिसत आहेत. एका नेटकऱ्याने भली मोठी कमेंट करीत लिहिले आहे कि, ‘सर्वात मोठी चूक झाली अक्षय कुमारला घेतले. 40 दिवसात तो महाराजांना स्वत मध्ये सामाऊन घेऊ शकेल..? यातून एकच गोष्ट ध्यानात येते. पैसे कमवण्यासाठी हे लोक चित्रपट बनवत आहेत.
हे सगळे महाराजांचे कौशल्य वापर करत आहेत. मराठी कलाकार मेला का..? ही भूमिका या फालतू कलाकाराला का दिली..? चेष्टा चालवली. शरद केळकर, अमोल कोल्हे, चिन्मय मांडलेकर आणि गश्मीर महाजनी यांनी इतक्या चांगल्या भूमिका केल्या आहेत. कारण त्यांच्या रक्तात महाराज आहेत आणि ते एक उत्तम अभिनेता आहे. अक्षय कुमारला घेतला कारण पैसा महत्त्वाचा आहे. यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांची चेष्टा होण्याआधी यांचा बहिष्कार करा’
याशिवाय आणखी एका नेटकऱ्याने कमेंट करत म्हटले आहे कि, ‘शरद केळकर असताना अक्षय का..?’ तर अन्य एकाने लिहिले आहे कि, ‘मराठी ऍक्टर नव्हते का..?’. एकंदरच नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांमधून मांजरेकरांनी निवड त्यांना अजिबात आवडलेली नाही हे स्पष्ट दिसत आहे. याशिवाय चित्रपटातील शिवरायांचे ७ मावळे म्हणून मराठी कलाकार प्रवीण तरडे, हार्दिक जोशी, सूर्या मांजरेकर, विराट मडके, विशाल निकम, जय दुधाणे आणि उत्कर्ष शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. ज्याबाबत मराठी प्रेक्षकांनी प्रचंड आनंद व्यक्त केला आहे.
Discussion about this post