हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बिग बॉस मराठी’चे तिसरे पर्व आता आणखीच भारी वाटू लागले आहे कारण दररोज घरात काही ना काही नवीन घडतंच. कधी टास्क नवा असतो तर कधी वाद. होय. कारण प्रत्येक स्पर्धक आता जिंकण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी दाखवत आहे. मग काय खेळ तर रंगणारच ना! एकीकडे घरात स्पर्धकांचे भलतेच ग्रुप झालेले बिग बॉसने तर फोडलेच. पण आता या ग्रुपमधील कधी काळी एक असणाऱ्या सदस्यांमध्ये वादाची ठिणगी पडल्याचे दिसत आहे. यात तृप्ती देसाई आणि मीरा जगन्नाथ यांच्यात असा काही वाद पेटला का दोघीनींही आवाजाची सीमाच पार केली. इतकेच काय तर तृप्ती देसाईंनी मीराला चांगलेच झापले.
कलर्स मराठीच्या अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्रामवर बिग बॉस शोचा नवा प्रोमो रिलीज झाला आहे. या प्रोमोत तृप्ती देसाई आणि मीरा जगन्नाथ यांच्यात बाचाबाची झाल्याचे दिसत आहे. दरम्यान मीराच्या दुटप्पी कृत्यामुळे तृप्ती देसाई चांगल्याच संतापल्या आणि मीराचा क्लास लगावला. अगं एका आठवड्यात तू किती शब्द फिरवतेस? तू स्वत:लाच बिग बॉस समजतेस का? इथे १४ जणं नाही, तर मी एकटीच खेळायला आली आहे, असं तुला वाटतं का?, असा प्रश्न तृप्ती देसाईंनी मीराला तोंडावर विचारला. त्यावर मीरा कुठे गप्प बसतेय. यावर मीरने त्यांच्यावर पलटवार करीत म्हटले कि, “म्हणते बायकांसाठी लढतेय, इतक्या खालच्या पातळीला जाऊ शकते ही बाई.
https://www.instagram.com/p/CUnAk9mN64_/?utm_source=ig_web_copy_link
बापरे बाप! आता असा वाद पेटेल तर प्रेक्षकांना मजा येणारच ना! दरम्यान, या दोघींचं भांडण पाहिल्यानंतर त्यांच्या चाहत्यांनीसुद्धा या वादात उडी घेतली आणि मग काय? मीराच्या चाहत्यांवर तृप्ती देसाईंचे चाहते पदे ना भारी. एकंदर हा प्रोमो आणि चाहत्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर महेश मांजरेकरांच्या बिग बॉसच्या प्रोमोतील फेमस डायलॉगची आठवण येते. ती म्हणजे, ‘लटकले ना भाऊ’! आता खऱ्या अर्थाने बिग बॉस मराठीच्या घरातील खेळ भन्नाट पद्धतीने सुरु झाला आहे. काय मग पाहताय ना? आपला मराठी ‘बिग बॉस ३’
Discussion about this post