हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय आणि तितकाच चर्चित रिएलिटी शो अर्थात बिग बॉस मराठी. नुकताच बिग बॉस मराठीचा तिसरा सीजन सुरु होऊन आठवडा सरला आहे पण राडा पहिल्या दिवसापासूनच सुरु आहे. यानंतर आता घरात टिकून राहण्यासाठी स्पर्धकांसमोर विविध आव्हाने आणि दुप्पट अडथळे येऊन ठाकली आहेत. त्यामुळे स्पर्धेचा दूसरा आठवडा आणखी जंगी होणार यात काहीच वाद नाही. जोडी की बेडी या आठवड्याची थीम असल्यामुळे आधीच स्पर्धक अन्य एका स्पर्धकांसोबत जोडीत अडकले आहेत. आता बिग बॉसनेच सदस्यांच्या जोड्या नेमून दिल्या म्हटल्यावर स्पर्धकांकडे उरला काय पर्याय? त्यामुळे आता संपूर्ण आठवडाभर सदस्यांना या जोड्यांसोबतच राहणे हाच काय तो शेवटचा पर्याय. यानंतर आता नवे टास्क आणि नवी लढत पाहायला मिळत आहे.
बिग बॉस मराठीच्या या गोजिरवाण्या घरामध्ये बर्याच गोष्टी घडताना दिसत आहेत. नव्या थीमनुसार आपल्या जोड्याजोड्यांमध्ये खेळणारे स्पर्धक एकेमकांना सल्ले देणे, स्ट्रॅटेजी सांगणे, दुसर्या ग्रुपमध्ये दाखल होणे, असे बरेच काही बघायला मिळत आहे. तसेच बिग बॉस यांनी सदस्यांनवर “नावं मोठे लक्षण खोटे” हे नॉमिनेशन कार्य सोपवले होते. या कार्यात आठवड्याभरात घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेत नॉमिनेट झालेलय सदस्यांची नावे जय, गायत्री, विशाल, विकास, आविष्कार, मीनल आणि शिवलीला अशी आहेत. या दरम्यान काल मीनल आणि स्नेहामध्ये मोठा वाद पेटला आणि त्यांनी आपले मुद्दे सदस्यांनसमोर मांडले. यानंतर आता आज या घरामध्ये ‘हल्ला बोल’ हा नवा टास्क आणि नवे वाद होताना दिसतील. आता हा टास्क नक्की काय आहे ? यामधून सदस्यांना काय मिळणार? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला आजचा भाग पहावा लागेल.
नुकताच रिलीज झालेला प्रोमो पाहाल तर यात दिसून येते की, एका टीम मधील २ सदस्य एका मोटर बाईकवर बसणार आहेत. यानंतर दुसर्या टीममधील सदस्य त्यांना उठवण्याचा प्रयत्न करणार आहेत. या प्रोमोमध्ये मोटर बाईकवर बसलेली पहिली जोडी आहे सोनाली पाटील आणि सुरेखा कुडची. तर दुसरी जोडी आहे विशाल निकम आणि विकास पाटील. या बसलेल्या जोड सदस्यांवर पाण्याचा, मॉइश्चरायझर, पावडर, अंडी या सर्व पदार्थांचा मारा होताना दिसतो आहे. इतकंच काय तर धूर देण्यात येत आहे. म्हणजेच त्यांना मोटर बाईकवरुन उतरवण्यासाठी हे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे हल्ला बोल या टास्कमध्ये आता कोणाची टीम विजयी होणार? कोण हरणार? आणि कोण जिंकणार? हे पाहण्यासाठी आजचा भागच पाहावा लागणार.
Discussion about this post